Posts

Showing posts from August, 2018

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा

Image
v युनिसेफ आणि जिल्हा आरोग्य विभागाचा उपक्रम यवतमाळ, दि. 28 :   गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता तसेच रुबेला या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता संपूर्ण राज्यात नोव्हेंबरमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने युनिसेफ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गोवर-रुबेला लसीकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, युनिसेफचे समन्वयक डॉ. तुषार भोयर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. सुभाष ढोले उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. दिलीप देशमुख म्हणाले, गोवर झाला की शरीरातील प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुलांच्या शरीरात व्हिटॅमीन - ए ची कमतरता जाणवते नव्हे ती बहुतांशी संपतेच. परिणामी अशी बालके आंधळी होण्याचा धोका संभवतो. शिवाय प्रतिकारशक्ती कमी झाली की डायरीया, न्युमोनिया, कुपोषण आदी आजार होण्याशी शक्यता असते. भारत

मिळालेल्या योजनेचा उपयोग गावच्या विकासासाठी करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
v समाजकल्याण विभागाच्या वतीने लाभार्थी सन्मान सोहळा यवतमाळ, दि. 27 : केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शकपणे लाभार्थ्यांना मिळत आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावर राहिल्या नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात सर्वसामान्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत आहे, त्यांनी त्या केवळ स्वत:पुरत्या मर्यादीत ठेवू नये. इतरांना त्याची माहिती देऊन गावच्या विकासासाठी या योजनांचा उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बचत भवन येथे आयोजित लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सदस्या रेणू शिंदे, न.प. स्थायी समिती सदस्य रेखा कोठेकर, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, पं.स. सदस्या सुनिता मडावी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, जि.प. समाजकल्याण अधिकारी विशाल जाधव आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग व जि.प. समाजकल्याण विभाग अति

महसूल राज्यमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

Image
पूरग्रस्त भागात 24 तास आरोग्य सेवा देण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 20 : गत आठवड्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे काही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभुमिवर महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. सततच्या पावसामुळे दिग्रस तालुक्यातील संपूर्ण दिग्रस शहर, बेलोरा, धानोरा (खुर्द) आदी ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सहपालकमंत्री संजय राठोड यांनी या भागाचा दौरा करून संबंधित यंत्रणेला उपाययोजनेबाबत सुचना केल्या आहेत. अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिग्रस, दारव्हा, नेर व पुसद येथील नगर पालिकेच्या अग्निशमन गाड्या त्वरीत बोलावून संपूर्ण शहरात साठलेला चिखल धुवून काढण्याचे आदेश दिले. पूर परिस्थिती ओसरली असली तरी या भागात रोगराई पसरू नये म्हणून 24 तास आरोग्य सेवा देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. येथील पूरग्रस्त लोकांकरीता बालाजी मंदीर, शास्त्री नगर, न.प.मराठी शाळा क्रमांक 3, देवनगर, जिजाऊ सांस्कृतिक भवन, बापू नगर येथे भोजनाची अविरत

पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरात फ्री वाय-फाय सेवेचा शुभारंभ

Image
32 ठिकाणी मोफत सुविधा देण्याचे नियोजन यवतमाळ, दि. 20 : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शहरात फ्री वाय-फाय सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ‘लव्ह यू यवतमाळ’ असे या वाय-फायचे नाव असून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद आणि बसस्थानक येथे 15 ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात ही सुविधा 32 ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना फ्री वाय-फाय सुविधा देण्याची संकल्पना पालकमंत्री मदन येरावार यांनी मांडली. त्यासाठी राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान विभाग, भारत संचार निगम लिमिटेड आणि यवतमाळ नगर परिषद यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनापासून ही सेवा शहरात सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे सर्वसामान्य जनतेला कॅशलेस बँकींग व्यवहार करणे, शासकीय व इतर संकेत स्थळावरील माहिती मिळविणे, ऑनलाईन अर्ज भरणे, ई-मेल पाठविणे आदी आवश्यक कामे स्वत:च्या मोबाईलवरून करता येतील. त्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड आणि क्वॉडजेन कंपनीकडून यवतमाळ शहरात 32 हॉटस्पॉट तयार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद आणि बसस्था

दिग्रस येथे पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

Image
v त्वरीत निधी वाटप करण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिग्रस येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना त्वरीत निधी वाटप करण्याच्या सुचना दिल्या. जिल्ह्यात 15 ऑगस्ट पासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे एकूण सहा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांना स्थलांतरीतसुध्दा करावे लागले. या पूरग्रस्तांच्या समस्या आणि प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी दिग्रस येथील वाल्मिकी नगर, घंटीबाबा मंदीर परिसर, मुख्य बाजारपेढ, धावंडा नदीलगतच्या निवासी वस्त्या आदी भागांना भेटी दिल्या. या भागात प्रशासनाने तात्काळ सर्व्हे करून पूरग्रस्त नागरिकांना निधी वाटप करावा. यात कोणतीही दिरंगाई नको, अशा सुचना त्यांनी केल्या. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धावंडा नदीचे रुंदीकरण, सरळीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रस्ताव पाठवावा. निधीअभावी को

नागरिकांना गतिमान सेवा देण्यावर भर - पालकमंत्री मदन येरावार

Image
v मेटीखेडा येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 16 : गावखेड्यातील नागरिकांना अनेक कामांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते. कळंब तालुक्याची लोकसंख्या, एकाच तहसील कार्यालयात होणारी गर्दी आणि नागरिकांना होणारा त्रास हे सर्व लक्षात घेता मेटीखेडा येथे अप्पर तहसील कार्यालयाची आवश्यकता होती. या कार्यालयातून नागरिकांना गतिमान सेवा देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. मेटीखेडा (ता. कळंब) येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, जि.प.सदस्य विजय राठोड, सरपंच राधेश्याम जयस्वाल, पं.स. सदस्य पुष्पा शेळके, अपर तहसीलदार रंजीत भोसले, मिर्झा रफी अहमद बेग आदी उपस्थित होते. या इमारतीच्या बांधकामासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मेटीखेडा येथील अप्पर तहसील कार्यालय नागरिकांच्या दृष्टी

बँकींग सेवा देतांना व्यवहारातील नम्रता आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार

Image
v जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस प्रणाली व डाटा सेंटरचे उद्घाटन यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ख-या अर्थाने शेतक-यांची बँक आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी बँकांनी आधुनिक सेवा देणे गरजेचे आहे. मात्र ही सेवा देत असतांना ग्राहक व        शेतक-यांप्रती बँकेच्या अधिकारी व कर्मचा-यांमध्ये व्यवहारातील नम्रता आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस व डाटा सेंटरचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी मंचावर बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, उपाध्यक्ष च.रा. गाडे पाटील, अनिरुध्द लोणकर, माजी अध्यक्ष विनायक येकरे, वसंत घुईखेडकर, सीबीएस प्रणालीचे सल्लागार कल्याण पाटील, व्हर्च्युअल गॅलेक्सीचे सचिन पांडे, अविनाश शेंडे आदी उपस्थित होते. 50 वर्षाच्या प्रवासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सीबीएस व डाटा सेंटरपर्यंत पल्ला गाठला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, नम्रता ही सिस्टीमने नाही तर मानवी स्वभावाने द्याव

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते 18 कोटींच्या विकासकामांचे भुमिपुजन

Image
v वातानुकूलित अभ्यासिका, सिंथेटिक ट्रॅक, अत्याधुनिक तारांगण, शवविच्छेदन गृहाचे विस्तारीकरण यांचा समावेश यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आदींच्या मुलभूत विकासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मदन येरावार यांनी 18 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन केले. यात विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिका, नागरिकांसाठी सिंथेटिक ट्रॅक, खगोलशास्त्रात आवड असणा-या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी तारांगण तसेच मृत कुटुंबियांची गैरसोय टाळण्यासाठी शवविच्छेदन गृहाचे विस्तारीकरण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी पाच कोटींची अभ्यासिका : वैशिष्ट्यपूर्ण   कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत पाच कोटी रुपयांच्या अभ्यासिका बांधकामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. परिस्थितीशी झुंजत असतांना गोर-गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचे महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. प्रशासनाच्या

वाघाडी नदी पुनरुज्जीवन राज्यासाठी पथदर्शी ठरणार

Image
v स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे प्रतिपादन v जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी यवतमाळ, दि. 16 : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत वनांवर आधारीत उद्योगांना चालना देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या किना-यावर फळबाग व वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाची मंजूरीसुध्दा मिळाली आहे. राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थ

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Image
यवतमाळ, दि. 15 : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे युवा माहिती दूत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपील्लेवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय येाजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत दुहेरी संवादातून शासनाच्या येाजना प्रभावीपणे पोहोचविण्यास समाजकार्याची आवड असलेल्या उ

शेतक-यांना पीककर्ज वाटप करणे हे कर्तव्य

Image
v जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात या खरीप हंगामात आतापर्यंत 46 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहेत. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी भुषणवाह नक्कीच नाही. आजही पीक कर्ज वाटपाबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहे. बँकांच्या अधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे कारण पीककर्ज वाटप करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, नाबार्डचे उपव्यवस्थापक दीपक पेंदाम, जिल्हा औद्योगिक केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार, अविनाश मोंढे, जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एस.बी. मिटकरी आदी उपस्थित होते. पीककर्ज वाटपामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची प्रगती कमी आहे. या बँकांनी प्रलंबित कर्ज प्रकरणांची शाखानिहाय त्वरीत माहिती द्यावी. ज्या पात्र शेतक-यांचे कर्ज प्रकरण प्रलंबित असतील, अशा बँकावर कारवाई करण्यात येईल. प

जिल्हाधिका-यांनी केली शेतात प्रत्यक्ष फवारणी

Image
                                     v शेतक-यांना सुरक्षा कीट आणि कामगंध सापळे वाटप v वैद्यकीय महाविद्यालयात फवारणीबाधित रुग्णांची विचारपूस यवतमाळ, दि. 2 : शेतमालावर फवारणी करतांना सुरक्षेची काळजी घेतली तर आपण स्वत:चा जीव वाचवू शकतो, हा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष शेतात फवारणी केली. यवतमाळ तालुक्यातील भिसनी येथील सुरेश पाडसेकर यांच्या शेतात सुरक्षा किटचे महत्व, कामगंध सापळे, बोंडअळीवर उपाययोजना आदींबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी आज येथे भेट दिली. शेतक-यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात एकूण लागवडीच्या जवळपास 50 टक्के जमिनीवर कपाशीची लागवड करण्यात येते. गत काही वर्षांपासून कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फवारणी करतांना जिल्ह्यात दुर्देवी घटना घडल्या. याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी कृषी, महसूल आणि आरोग्य विभागाच्यावतीने किटकनाशक फवारणीसंदर्भात विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत राबविण्या

सोशल मिडीयावर जबाबदारीने वागणे गरजेचे - अपर पोलिस अधिक्षक जाधव

Image
v फेकन्यूज परिणाम व दक्षताबाबत पत्रकारांची कार्यशाळा यवतमाळ, दि. 1 : लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांचे अनन्यसाधारण महत्व आहे. समाजाला दिशा देणारा घटक म्हणून याकडे बघितले जाते. मात्र आज सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. यात कोणतीही शहानिशा न करता मोठ्या प्रमाणात माहिती फॉरवर्ड केली जाते. ही माहिती कट-पेस्ट करून अपलोड होत असल्याने त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. शिवाय यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फेकन्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिद्दमवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. पुढे बोलतांना अपर पोलिस अधिक्षक जाधव म्हणाले, गत काही दिवसांत देशात आणि राज्यात दुर्देवी घटना घडल्या आहेत. समाजातील काही बेजबाबदार घटक जाणिवपूर्वक अशा पोस्ट सोशल म

यवतमाळ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालयास तत्वत: मंजुरी

v पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ येथील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाचा रखडलेला प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे निकाली निघाला आहे. येथील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला शासनाने मंजूरी दिल्यामुळे यवतमाळकरांचे कृषी महाविद्यालयाचे स्वप्न साकार होणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणा-या यवतमाळ येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला मंत्री मंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे. पश्चिम विदर्भात व अमरावती विभागात अकोलानंतर हे दुसरेच शासकीय कृषी महाविद्यालय आहे. या कृषी महाविद्यालयाचा फायदा यवतमाळ जिल्ह्यासोबतच बाजुच्या वाशिम, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांनासुध्दा होणार आहे. सदर कृषी महाविद्यालय हे यवतमाळ शहरालगत 30 हेक्टर जागेत उभारण्यात येईल. यासाठी 63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने महाविद्यालयासाठी मुख्य प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठी वर्ग, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह, विश्रामगृह आदी इमारती उभारल्या जाणार आहेत. तसेच महाविद्यालयासाठी लागण

जिल्हाधिका-यांनी घेतली बियाणे, किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक

Image
v फिल्डवर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 1 : शेतक-यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्वाचा आहे. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. गत वर्षी बोंड अळीचे संकट आणि किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात दुर्देवी घटना घडल्या. यावर वेळीच उपाय करण्यासाठी व शेतक-यांना नियोजनपध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे तसेच किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षी जिल्ह्यात फवारणीबाधित रुग्णांची संख्या आढळून आली. यात काही दुर्देवी घटना घडल्या. यावर्षीसुध्दा फवारणीबाधित रुग्ण आढळून येत आहे. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी शेतक-यांना किटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागासह इतर विभाग व कृषी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे. विशेष म्हणजे फिल्डवर काम होतांना दिसणे गरजेचे