Posts

Showing posts from June, 2020

प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त नमुने तपासणीकरिता पाठवा -- जिल्हाधिकारी सिंह

Image
                                             संशयीतांची टेस्ट निगेटीव्ह आल्यास कोवीड सेंटरमधून लगेच सुटी यवतमाळ, दि.30 : जिल्ह्यात प्लाझ्मा थेरीपीसाठी प्लॉझ्मा संकलनाची सुरूवात करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणु नमुन्यांची तपासणी जलद होण्यासाठी जिल्ह्यात अजून एक टेस्टींग मशीन घेण्यात येणार आहे. मात्र प्रत्येक तालुक्यातून नमुने संकलनाला गती देण्यात यावी व रोज कमीत कमी 25 किंवा त्यापेक्षा जास्त नमूने   तपासणीला पाठवावे,   अशा सूचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिल्या. नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर.पी. सिंग, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात न आलेले तथापि केवळ संपर्काचा संशय म्हणून कोवीड केअर सेंटरमध्ये भरती

दिवसभरात 11 नवीन पॉझेटिव्ह ; 6 जणांना डिस्चार्ज

* 24 तासात 180 रिपोर्ट निगेटिव्ह यवतमाळ, दि.30 : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले सहा जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि. 30) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये एक व्यक्ती दिग्रस येथील तर दहा जण नेर येथील आहे. यात नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 51 होती. यात मंगळवारी 11 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 62 वर गेला. मात्र आज रूग्णालयातून ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या सहा जणांना सुट्टी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 56 वर आली आहे. गत चोविस तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 194 रिपोर्ट प्राप्‍त झाले. यापैकी 11 पॉझेटिव्ह, 180 निगेटिव्ह तर तीन रिपोर्टचे निदान अचून नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 279 झाली आहे. यापैकी 214 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह, एकाला डिस्चार्ज

Ø 24 तासात 52 रिपोर्ट निगेटिव्ह यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात सोमवारी एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तर सुरवातीला पॉझेटिव्ह असलेला व आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि.29) नव्याने पॉझेटिव्ह आलेली महिला दिग्रस येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 51 वरून 52 झाली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डातून एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या पुन्हा 51 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 53 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर 52 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 65 जण भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 268 झाली आहे. यापैकी 208 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या नऊ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4794 नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी 4560 प्राप्त तर 234 अप्राप्त आहे. ज

'पाझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 16 जणांना सुट्टी

Ø एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु तर एक नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यु झाला आहे. तर एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 16 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवारी मृत्यु झालेला व्यक्ती (वय 75) हा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या नऊ झाली आहे. तसेच आज यवतमाळ तालुक्यातील लाडखेड येथील एक पुरुष नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता. एक मृत्यु व एक नव्याने पॉझेटिव्ह आल्याने ही संख्या 67 वर स्थिरावली. मात्र रविवारी 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर आली आहे.   गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 115 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर 114 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 68 जण भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्

नागरिकांच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण कामांचे नियोजन करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                                  Ø ई-लायब्ररी, बायोटॉयलेट, नाट्यगृह प्रस्तावित Ø सांडपाणी पुनर्वापरासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्याच्या सूचना यवतमाळ, दिनांक 28 : भविष्याचा वेध घेऊन नागरिकांना कायमस्वरूपी उपयोगी ठरतील अशा जनकल्याणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य आहे. तसेच तालुकास्तरावर विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थी उंचीचे नवे शिखर पादाक्रांत करू शकतील. त्यामुळे ई-लायब्ररी, बायोटॉयलेट, नाट्यगृह यासारख्या नाविन्यपूर्ण कामांचे अधिका-यांनी नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. यवतमाळ येथील विश्रामगृहात नेर, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यातील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, श्री. कारिया, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उप

पालकमंत्र्यांचा क्वॉरंटाईन कक्षातील नागरिकांशी संवाद

Image
Ø दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा 'ऑनफिल्ड' आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहे. नेर, दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच येथील कोव्हीड केअर सेंटर आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. शासन -   प्रशासन आपल्या सोबत आहे. काही अडचण असेल तर त्वरीत सांगा. येथे जेवण कसे मिळते, स्वच्छता नियमित होते का, आदीबाबत त्यांनी आपुलकीने विचारणा केली. कोव्हीड केअर सेंटर तसेच क्वॉरंटाईनकरीता अधिग्रहीत केलेल्या इमारतींमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. येथील नागरिकांना मिळणा-या जेवणाबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आहाराबाबत विशेष काळजी घ्या, अशा सुचना त्यांनी केल्या.   तसेच दिग्रस शहरातील देवनगर या प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली असता येथील गरजवंतांना अन्नधान्य किट त्वरीत पुरवाव्या, असे निर्देश प्र

रुग्णालयातून एकाला सुट्टी, 134 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Ø चार जण नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 27 : आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेला रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात चार जण नव्याने पॉझेटिव्ह आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गत 24 तासात 134 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज (दि. 27) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यात दारव्हा येथील एक महिला, वणी येथील महिला आणि यवतमाळ शहरातील एक महिला व एक पुरुष आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 64 होती. एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 63 वर आली. मात्र नव्याने चार पॉझेटिव्ह आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 वर पोहचला आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 138 रिपोर्ट प्राप्त झाले. यात चार जण पॉझेटिव्ह तर 134 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 86 जण भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 266 झाली आहे. यापैकी तब्बल 191 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे लक्ष द्या - पालकमंत्री राठोड

Image
Ø नेर आणि दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी यवतमाळ, दि. 27 : नेर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित केला आहे. मात्र या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. नेर येथील नवाबपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, श्रीकांत देशपांडे, इब्राहीम चौधरी  आदी उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील व्यापा-यांनी स्वयंस्फुर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरीता अत्यावश्यक वस्तुंच्या सेवेची दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे. मात्र कोठेही गर्दी होणार नाही. तसेच

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : जिल्ह्यात 12 जणांना सुट्टी

Image
Ø चार जण नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि.26, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 12 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 4 जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 64 झाली आहे.             जिल्ह्यात गुरूवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 72 होती. यापैकी 12 जणांना सुट्टी झाल्यामुळे हा आकडा 60 वर आला. मात्र शुक्रवारी चार जण नव्याने पॉझेटिव्ह आल्यामुळे आयासोलेशन वार्डात तसेच इतर ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 64 वर पोहचली आहे. आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये 2 पुरूष तर 2 महिला आहेत. यात दिग्रस येथील 3 जण आणि दारव्हा येथील एकाचा समावेश आहे.             आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत 88 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 262 वर पोहचली असून यापैकी सद्यस्थितीत 64 ॲक्टीव पॉझेटिव्ह तर आतापर्यत 190 जणांना बरे झाल्यामूळे सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधीत

जिल्हाधिका-यांची वणी येथील जिनिंगला भेट

Image
यवतमाळ, दि. 25 : वणी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे गुरुवारी वणीच्या दौ-यावर होते. यादरम्यान त्यांनी वणी येथील साईकृपा जिनिंगला भेट देऊन कापूस खरेदीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सीसीआयचे प्रतिनिधी कृष्णा रेड्डी, जिनिंग मालक सुनील कातकडे, तहसीलदार, सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, खरीपाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांना पैशाची गरज आहे. अशावेळी नोंदणीकृत शेतक-यांच्या घरात असलेला कापूस जिनिंगने त्वरी त खरेदी करावा. वणी येथील जिनिंगवर नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी तालुक्यातून जास्तीत जास्त गाड्या पाठविण्यासाठी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी गांभिर्याने प्रयत्न करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दारव्हा, दिग्रस, नेर आणि आर्णी येथून गत आठवड्यात एकूण 1075 गाड्यांची आवक झाली.   यात 16 जून रोजी चारही तालुक्यातून 81 गाड्या, 17 जून रोजी 108 गाड्या, 18 जून रोजी 118 गाड्या, 19 जून रोजी 155, 22 जून रोजी 132, 23 जून रोजी 166 तर 24 जून रोजी 149 गाड्यांचा समावेश आहे, अशी

दिवसभरात पॉझेटिव्ह रुग्णामध्ये वाढ नाही

Image
Ø जिल्ह्यात 118 रिपोर्ट निगेटिव्ह यवतमाळ, दि. 25 : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांनाच गुरुवारी मात्र दिवसभरात एकाही पॉझेटिव्ह रुग्णाची भर पडली नाही. ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णाचा आकडा 72 वर स्थिरावला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 80 जण भरती आहे. तसेच गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 128 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 रिपोर्ट निगेटिव्ह तर 10 नमुन्यांचे अचून निदान न झाल्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली आहे. यात 72 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4260 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4135 प्राप्त तर 125 अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकूण 3877 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्हाधिकारी रोज विवि

अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø न उगविलेले बियाणांबाबत कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक यवतमाळ, दि. 25 : यावर्षीच्या खरीप हंगामात बहुतांश शेतक-यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सोयाबीनचे बियाणे उलवलेच नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. जिल्ह्यात न उगवलेल्या सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात 9 लक्ष 2 हजार हेक्टरपैकी जवळपास अडीच लक्ष हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ज्या शेतक-यांचे बियाणे पेरणीनंतर

जिल्ह्यातील 17 जण कोरोनामुक्त

Image
Ø 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेले 17 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 78 वरून 61 वर आला होता. मात्र जिल्ह्यात पुन्हा नव्याने 11 जणांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा आता 72 झाला आहे.  बुधवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 11 जणांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील एक पुरुष, वणी येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक महिला, दारव्हा येथील एक पुरुष आणि दोन महिला तर नेर येथील दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 58 जण भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली असून यापैकी सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 72 आहे. तसेच उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

15 पॉझेटिव्ह रुग्णांची वाढ, 224 रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 23 : गत दोन तीन दिवसांपासून 63 वर स्थिरावलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझेटिव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 26 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 पॉझेटिव्ह तर 11 निगेटिव्ह रिपोर्ट आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह   रुग्णांची संख्या 78 आहे. तसेच 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 224 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.    वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3971 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3673 प्राप्त तर 298 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 247 आहे. यापैकी 78 एक्टिव पॉजिटिव्ह असून 161 लोकांना बरे

कलेक्टर, एसपी आर्णीच्या प्रतिबंधित क्षेत्रात ‘ऑनफिल्ड’

Image
यवतमाळ, दि. 22 : सुरवातीला शहरी भागात असलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाला आहे. ही नक्कीच चिंतेची बाब असली तरी संपूर्ण प्रशासन ‘हाय अलर्ट’ राहून कार्य करीत आहे. आर्णी येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आज (दि.22) आर्णी येथील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष जावून परिस्थितीचा आढावा घेतला. आर्णी येथील प्रतिबंधित क्षेत्रात 89 कुटुंब असून लोकसंख्या 369 आहे. या भागात आढळलेल्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) सात जणांचे आणि जवळच्या संपर्कातील (लो रिस्क काँटॅक्ट) 46 जणांचे नमुने सोमवारी तपासणीकरीता पाठविण्यात आले. या प्रतिबंधित क्षेत्रातून आणखी किमान 50 जणांचे नमुने तपासणीकरीता त्वरीत पाठवावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या भागासाठी आरोग्य विभागाचे तीन पथक कार्यरत असून एक फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. आरोग्य पथकाच्या सहाय्याने नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरने तपासणी होत असून ही तपासणी अतिशय काळजीपूर्व करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले

शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णयाप्रमाणे कार्यप्रणाली तयार करा

Image
v जिल्हाधिका-यांच्या गटशिक्षणाधिका-यांना सुचना यवतमाळ, दि. 22 : चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यास विलंब होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, मास्कचा वापर आदी बाबींची अंमलबजावणी अतिशय महत्वपूर्ण आहे. याबाबत शासनाने 28 एप्रिल आणि 15 जून रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून त्याप्रमाणेच कार्यप्रणाली तयार करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, शिक्षणाधिकारी डी.आर.चवणे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांनी आपापल्या क्षेत्रानुसार एसओपी तयार करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शाळेत स्वच्छता, आहार, शिक्षण आणि शारीरिक व्यायाम यावर फोकस ठेवावा. तसेच विद्यार्थ्यांसाठी हॅन्डवॉश, साबण, मास्कचा वापर, सोडीयम हायड्रोल्कोरीनने फवारणी

एका रुग्णाचा मृत्यु, पाच जणांचा डिस्चार्ज

यवतमाळ, दि. 21 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका रुग्णांचा (वय 64 वर्षे) रविवारी मृत्यु झाला. त्यांना सारीची लक्षणे होती. त्यामुळे जिल्ह्यात एकूण आठ मृत्यु झाले आहेत. तसेच भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.   जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 56 आहे. यापैकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 28 जण भरती असून इतर लोक तालुका स्तरावरील कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 225 झाले असून यापैकी तर 161 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ जणांच्या मृत्युची नोंद आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 75 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 3527 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3397 प्राप्त तर 130 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3172 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. 0000000

आणखी एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर.... जिल्हाधिकारी दारव्हा आणि नेरच्या प्रतिबंधित क्षेत्रात

Image
यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने पॉझेटिव्ह रुग्णाच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. 48 वर्षीय या व्यक्तीचा रिपोर्ट आज (दि. 20) पॉझेटिव्ह प्राप्त झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 52 झाली असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 35जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 215 आहे. यापैकी 156 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आज प्राप्त एकूण 235 रिपोर्टपैकी एक पॉझेटिव्ह तर 229 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पाच नमुन्यांचे अचूक निदान न झाल्याने सदर नमुने पुन्हा तपासण्यात येणार आहे. निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाच रिपोर्ट, कोव्हीड केअर सेंटरमधील 72, यवतमाळच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सहा, दारव्हा येथील 46, नेर येथील 65, दिग्रस येथील 22 आणि पुसद येथील 13 रिपोर्टचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 3363 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3323 प्राप्त तर 40 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आत

दिवसभरात आठ पॉझेटिव्ह, सात जणांना डिस्चार्ज

यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात आज (दि.19) दिवसभरात आठ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात सात महिला आणि एक पुरुष आहेत. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले सात जण ‘पाझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दारव्हा येथील एकूण सात जण तर आर्णी येथील एक जण आहे. दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच 25, 25, 34, 58, 40, 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर आर्णि येथील महिला 55 वर्षांची आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50 होती. यात सात जणांना सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 43 झाली. मात्र आज नव्याने आठ पॉझेटिव्ह वाढल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 जण भरती आहे. शुक्रवारी महाविद्यालयाने 51 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 3302 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3080 प्राप्त तर 219 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 214 वर पोहचली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु

Ø शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे यवतमाळ, दि.18 : कोरोना प्रार्दुभावामुळे स्थगित करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुनश्च सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे रुपये दोन लाखपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 जाहीर केली होती. तथापि या योजनेची अंमलबजावणी सुरु असताना कोरोना विषाणु रोगाच्या आजाराचा प्रार्दुभाव होऊ नये याकरीता दिनांक 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संबंधातील पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रीया बंद ठेवण्यात आली होती.   यादरम्यान ज्या शेतक-यांची नावे कर्जमुक्तीचे यादीमध्ये आली आहेत, त्यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे, अशा शेतकऱ्यांना सन 2020-21 चे खरीप हंगामात नव्याने पीक कर्जवाटप करण्यासाठी दिनांक 22 मे 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.   त्यामुळे योजनेतील पात्र शेतक-यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे

कापूस खरेदीत तफावत आढळल्याने कारवाईचे निर्देश

Image
Ø दारव्हा येथील जिनिंगला जिल्हाधिका-यांची अचानक भेट यवतमाळ, दि. 18 : शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गत आठवड्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यात सीसीआय व कॉटन फेडरेशन यांना कापूस खरेदीबाबत अंतिम नियोजनसुध्दा आखून देण्यात आले होते. त्यानुसार रोज किमान किती गाड्या कोणत्या जिनिंगवर जाईल, आदी सुचना देण्यात आल्या. तरीसुध्दा दारव्हा येथील जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. दारव्हा येथील जाधव जिनिंगला जिल्हाधिका-यांनी अचानक भेट देऊन कापूस खरेदीबाबत आढावा घेतला.   सदर जिनिंगमध्ये रोज किमान 50 गाड्या घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र या जिनिंगमध्ये अतिशय कमी गाड्या घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतक-यांना कापूस खरेदी करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. जाधव जिनिंगमध्ये 15 जून रोजी 24 गाड्या, 16 जून रोजी 17 गाड्या, 17 जून रोजी एकही गाडी नाही शिवाय जिनिंगमध्ये कापूस खरेदी बंद आणि 18 जून रोजी केवळ