जिल्ह्यात आणखी एक पॉझेटिव्ह तर एकाला सुट्टी


यवतमाळ, दि. 09 :  महागाव येथील कारोनाबाधित मृतकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाने भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाला कोव्हीड केअर सेंटर येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34 झाली होती. मात्र भरती असलेला एक जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्हचा आकडा पुन्हा 33 झाला आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 86 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह तर उर्वरीत 85 निगेटिव्ह आहेत. मंगळवारी महाविद्यालयाने 113 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2552 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 2491 प्राप्त आहेत. 61 नमुन्यांचे रिपोर्ट अद्यापही अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 158 वर गेली आहे. यात सद्यस्थितीत भरती असलेले 33 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह, उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेले 123 तर दोन मृतकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून 2333 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी