जिल्हाधिका-यांची वणी येथील जिनिंगला भेट



यवतमाळ, दि. 25 : वणी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे गुरुवारी वणीच्या दौ-यावर होते. यादरम्यान त्यांनी वणी येथील साईकृपा जिनिंगला भेट देऊन कापूस खरेदीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सीसीआयचे प्रतिनिधी कृष्णा रेड्डी, जिनिंग मालक सुनील कातकडे, तहसीलदार, सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, खरीपाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांना पैशाची गरज आहे. अशावेळी नोंदणीकृत शेतक-यांच्या घरात असलेला कापूस जिनिंगने त्वरीत खरेदी करावा. वणी येथील जिनिंगवर नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी तालुक्यातून जास्तीत जास्त गाड्या पाठविण्यासाठी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी गांभिर्याने प्रयत्न करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दारव्हा, दिग्रस, नेर आणि आर्णी येथून गत आठवड्यात एकूण 1075 गाड्यांची आवक झाली.  यात 16 जून रोजी चारही तालुक्यातून 81 गाड्या, 17 जून रोजी 108 गाड्या, 18 जून रोजी 118 गाड्या, 19 जून रोजी 155, 22 जून रोजी 132, 23 जून रोजी 166 तर 24 जून रोजी 149 गाड्यांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००००


Comments

  1. आज ची नेर मार्केट मधील गर्दी पाहता पेशंट वाढायला वेळ लागणार नाही
    सोसियल दिस्ट्सिंग कुठेच दिसत नाही २६जून२०२०

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी