बरे झालेल्या 11 कोरोनाबाधित रुग्णांना सुट्टी


v तीन नवीन पॉझेटिव्ह तर 88 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 07 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलशेन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 11 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रविवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि.7) तीन नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 33 वर आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या 91 जणांचे रिपोर्ट्स शनिवारी रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यात 3 जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह तर उर्वरित 88 रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. प्राप्त झालेल्या रिपोर्ट्समध्ये महागाव येथील 32 पैकी 3 पॉजिटिव्ह आणि 29 रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. पॉजिटिव्ह आलेले तीनही जण हे महागाव येथील मृत पॉजिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क कॉन्टेक्ट) आहे. याशिवाय उमरखेड़ येथील 23 रिपोर्ट नेगेटिव्ह, पुसद येथील 31 रिपोर्ट नेगेटिव्ह, बोरगांव येथील 1, रुई तलाव, मसरुळ येथील 1 आणि घाटंजी येथील एका जणाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. तसेच आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या दोनपैकी एकाचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटिव्ह (रिपीट) आणि एकाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत 41 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी तीन नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही संख्या 44 वर गेली. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले 11 जण 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 33 वर आली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्ण 157 झाले. यापैकी तब्बल 122 पॉजिटिव्ह रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कौतुक केले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुशार वारे यांचे अभिनंदन केले आहे.

आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 40 जण भरती आहेत. यात सात जण प्रिझमटिव्ह आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने 2383 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 2363 प्राप्त तर 20 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात एकूण 2206 जण निगेटिव्ह आले आहेत. दोन कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यु झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, अनावश्यकपणे बाहेर पडू नये, बाहेर जातांना मास्क लावूनच जावे, कुठेही गर्दी करू नये, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन करावे, सैनिटाइजरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी