जिल्ह्यात आणखी एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर


v आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती

यवतमाळ, दि. 03 : पुसद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या व्यक्तिचा (वय 45) रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एक ने वाढ झाली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात 37 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती असून यापैकी 13 केसेस प्रिझमटिव्ह आहे.

बुधवारी पॉझेटिव्ह आलेला व्यक्ती मुंबईवरून 25 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या गावी आला होता. खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे वैद्यकीय मदतीकरीता त्याने गावच्या सरपंचासोबत संपर्क केला. त्यानंतर पुसद येथील प्रशासनाने रुग्णवाहिका पाठवून सदर व्यक्तिला भरती करून घेतले. मात्र मी कोणाच्याही संपर्कात आलो नाही, असे या व्यक्तिचे म्हणणे आहे. या व्यक्तिच्या कुटुंबातील चार सदस्य अजून मुंबईला आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 6 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह तर पाच रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयाने 30 नमुने तपासणीकरीता पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत 2189 नमुने पाठविण्यात आले आहे. यापैकी 2159 नमुने प्राप्त तर 30 अप्राप्त आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 146 झाला आहे. यापैकी 37 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह सध्यास्थितीत भरती असून 106 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 2013 जणांचे रिपोर्ट आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 13 तर गृह विलगीकरणात 443 जण भरती आहे.

 

गृह विलगीकरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या युवकावर गुन्हा दाखल : मौजे हिवरी येथील अमोल देवीदास पवार (वय 42) हा दुस-या जिल्ह्यातून हिवरी येथे आला होता. नियमानुसार त्याची आरोग्य तपासणी करून त्याला गृह विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले. ग्रामस्तरीय समितीने त्याच्या घरी भेट दिली असता सदर व्यक्ती घरात न थांबता सतत बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्राम समितीने घरच्या सदस्यांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हिवरीचे तलाठी यांच्या तक्रारीवरून अमोल पवारविरुध्द भा.दं.वि.कलम 188 नुसार यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी