इंदिरा नगरचा काही भाग वगळता प्रतिबंध हटविले


v नेर आणि धानोरासुध्दा प्रतिबंध मुक्त

यवतमाळ, दि. 01 : यवतमाळ शहरातील इंदिरा नगर येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर येथील नागरिकांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. शहरातील इतर भागात हा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने 9 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये सदर भागाच्या 3 कि.मी. परिघीय क्षेत्राच्या सीमा बंद केल्या होत्या. आता मात्र इंदिरा नगरचा काही भाग वगळता बहुतांश भागातील प्रतिबंध काढण्यात आले आहे.

यवतमाळ शहरातील इंदिरानगर परिसरात शेवटचा कोरोना संक्रमणाचा रुग्ण दिनांक 20 मे 2020 रोजी आढळलेला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरातील इंदिरा नगर परिसर मोठा आहे. 20 मे रोजी कोरोना पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घराशेजारील भाग प्रतिबंधित ठेवण्यात आला आहे. यात इंदिरानगर मशीद चौक ते नेहा प्रोव्हीजनपर्यंत, नेहा प्रोव्हीजन ते हनुमंत कटरे यांच्याघरापर्यंत, हनुमंत कटरे यांचे घर ते आरीफ किराणा पर्यंतचा परिसर वगळून इंदिरा नगर येथील उर्वरित भागाच्या सीमा 1 जून रोजी सकाळी 7 वाजतापासून प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत.

तसेच नेर येथील वलीसाहब नगर प्रोफेसर कॉलनी प्रतिबंधीत क्षेत्रातून कोरोना विषाणू संसर्गाचे नवीन रुग्ण आढळून आलेले नाही. त्यामुळे त्या भागाच्या सीमा बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्यामुळे नेर येथील वलीसाहब नगर प्रोफेसर कॉलनी भागाच्या बंद करण्यात आलेल्या सीमासुध्दा मुक्त करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील मौजा धानोरा ता. उमरखेड या प्रतिबंधित क्षेत्रातूनसुध्दा कोरोना विषाणू संसर्गाचे नवीन रुग्ण आढळून आलेले नाही. त्यामुळे धानोरा या गावाच्या बंद करण्यात आलेल्या सीमा सोमवारी सकाळी 7 वाजतापासून प्रतिबंधमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

वरील तीनही क्षेत्रातून प्रतिबंधक काढण्यात आले असले तरी या भागामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम आणि फिवर क्लिनीक पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार असल्याचे आदेशात नमुद आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी