जिल्ह्यात 584.38 कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप


यवतमाळ, दि. 09 :   खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात आतापर्यंत  77 हजार 863 शेतकऱ्यांना 584 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या 27 टक्के पीककर्ज वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे. तरीसुध्दा राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज वाटप कमी असून त्यांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीतवर जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अग्रणी बँकेचे श्री. टापरे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके व सर्व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपरोक्त कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांनी 21041 शेतक-यांना 212 कोटी 93 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले असून ते एकूण उद्दिष्टाच्या 16 टक्के आहे. खाजगी बँकानी 469 शेतकऱ्यांना 11 कोटी 71 लाख रुपये पिक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने 2170 शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 54183 शेतकऱ्यांना 337 कोटी 70 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले ते एकूण उद्दिष्टाच्या 62 टक्के आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

            यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रधानमंत्री मुद्रा आयोजनेबद्दल आढावा घेतला. जिल्हा अग्रणी बँकेचे उपप्रबंधक सचिन नारायणे यांनी मुद्रा योजनेबद्दल वर्षनिहाय माहिती सादर केली. यवतमाळ जिल्ह्यात 2015 पासून तर जून 2020 पर्यंत एकूण 520781 लोकांना 1597 कोटी 69 लाख रुपये वाटप केलेले आहे. त्यात शिशु गटात 493449 लोकांना 1230 कोटी 38 लाख रुपये, किशोर गटात 21446 लोकांना 211 कोटी 55 लाख रुपये व तरुण गटात 5886 लोकांना 155 कोटी 76 लाख रुपये वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

००००००


Comments

  1. सर दारव्हा तालुक्यातिल शेतकर्याना अजूनही पिक कर्ज मिलाला नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी