15 पॉझेटिव्ह रुग्णांची वाढ, 224 रिपोर्ट निगेटिव्ह


यवतमाळ, दि. 23 : गत दोन तीन दिवसांपासून 63 वर स्थिरावलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझेटिव्ह आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 26 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 पॉझेटिव्ह तर 11 निगेटिव्ह रिपोर्ट आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह  रुग्णांची संख्या 78 आहे. तसेच 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 224 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.  

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3971 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3673 प्राप्त तर 298 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 247 आहे. यापैकी 78 एक्टिव पॉजिटिव्ह असून 161 लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात  8 लोकांच्या मृत्युची जिल्ह्यात नोंद असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3452 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी