जिल्ह्यात दोन पॉझेटिव्ह रुग्णांची भर, एकाला सुट्टी


v 65 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 10 :  महागाव येथील कारोनाबाधित मृतकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तिंचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 35 झाली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 34 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह एकूण 43 जण भरती आहे.

गत 24 तासात प्राप्त झालेल्या रिपोटपैकी दोन रिपोर्ट पॉझेटिव्ह तर 65 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2564 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2558 प्राप्त तर सहा रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 160 वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 34 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहेत. उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 124 असून जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून 2398 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

 

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 77  टक्के : जिल्हाधिकारी सिंह

यवतमाळ जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या दीडशेपार असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्के आहे. आतापर्यंत 124 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. पॉझेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होताच त्यांचे अगदी निगटचे व कमी संपर्कातील (हाय रिस्क व लो रिस्क) लोकांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. लगेच अशा लोकांना जवळच्या कोव्हीड केअर सेंटर किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येते. त्यांचे नमुने तपासणीकरीता तात्काळ प्रयोगशाळेत पाठविले जातात. पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले, मात्र कोव्हिडची लक्षणे नाही, अशाही लोकांच्या नमुन्यांची तपासणी केली असता 90 टक्के लोकांना लक्षणे नव्हती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही. या रुग्णांचे उपचार व प्रोटीनयुक्त आहारावर विशेष लक्ष केंद्रीत केले. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष आहारतज्ज्ञ नेमण्यात आल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चांगला राहिला आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.   

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी