तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, पानठेल्याला प्रतिबंध


v सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई

यवतमाळ, दि. 03 : जिल्ह्यात 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच 1 जूनच्या आदेशान्वये यवतमाळ जिल्ह्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने, पानठेला प्रतिबंधीत केलेला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधीत करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

शासकीय, निमशासकीय, खाजगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवाशी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्ते, बाजारपेठा इत्यादी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी, आवारातही तसेच इतर ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिविरुध्द प्रथम आढळल्यास 1 हजार रु. दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसऱ्यांदा आढळल्यास 3 हजार रू. दंड व 3 दिवस सार्वजनिक सेवा, तिसऱ्यांदा व त्यांनतर आढळल्यास 5 हजार रु. दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा अशी कारवाई करण्यात येईल.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा -2003 नुसार कलम 4 नुसार 200 रुपयांपर्यंत दंड, पहिला गुन्हा 1 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही. दुसरा गुन्हा 5 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 5 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही. उत्पादकाकरीता पहिला गुन्हा 5 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 5 वर्षाची शिक्षा. विक्रेत्याकरीता पहिला गुन्हा 1 हजार पर्यंत दंड किंवा 1 वर्ष शिक्षा. दुसरा गुन्हा 3 हजार पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा राहील.

वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मुंबई पोलीस अधिनियम 1951 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 268, 270, 272 व 278, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा – 2003 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी