जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ नाही



v लक्षणे दिसताच त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 04 : गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गुरुवारी जिल्ह्यात एकाही नवीन पॉझेटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 42 वर स्थिरावली आहे. गुरूवारी  आयसोलेशन वॉर्डात चार नवीन रुग्ण भरती झाल्यामुळे सद्यस्थितीत येथे एकूण 55 जण भरती आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 150 आहे. यापैकी 42ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह सध्यास्थितीत भरती असून 106 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 18 नमुने येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 2208 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 2190 प्राप्त तर 18 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात एकूण 2039 जणांचे रिपोर्ट आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 10 तर गृह विलगीकरणात 443 जण भरती आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन : राज्याच्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून गृह विलगीकरणात राहावे. बाहेरून आलेल्या नागरिकांनी स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. असे प्रकार आढळल्यास गावक-यांनी संबंधित तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, ठाणेदार किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेस त्वरीत कळवावे. जेणेकरून गृह विलगीकरण नियमाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिविरुध्द भादंविच्या कलम 188 नुसार गुन्हा नोंद करता येईल. तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना कोव्हिडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, सारी, आयएलआय व इतर लक्षणे असल्यास त्यांनी जवळच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटल किंवा 07232-239515 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी