आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु


v एकाच दिवशी दारव्हामध्ये 12 जण पॉझेटिव्ह

v कलेक्टर, एसपी दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्रात दाखल

यवतमाळ, दि. 16 : गत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत आहे. तसेच मृतांची संख्या देखील वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आज (दि. 16) जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या एकूण सात झाली आहे. तर मंगळवारी दारव्हा येथील 12 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले.

कोरोनामुळे आज मृत झालेला व्यक्ती हा 60 वर्षाचा आहे. तोसुध्दा दारव्हा येथील रहिवासी असून त्याचा मृत्यु घरीच झाला. त्याचे नमुने तपासणीकरीता यवतमाळ येथे पाठविले असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. तसेच मंगळवारी दारव्हातील 12 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हे सर्व जण सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्टमधील) आहे. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये सहा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये दारव्हा येथील 70 वर्षीय आणि 66 वर्षीय पुरुषांसह 12, 12, 7, व 6 वर्षीय मुलांचा समावेश आहे. तसेच 46 आणि 35 वर्षीय महिलांसह 23, 21, 16 व 12 वर्षीय मुलींचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 44 झाली असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह 197 झाले आहे. यापैकी तब्बल 146 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 42 जण भरती आहेत.

 

कलेक्टर, एसपी दारव्हात दाखल : दारव्हा येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लगातार वाढत असल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार मंगळवारी दारव्हामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तालुका प्रशासनाच्या अधिका-यांसोबत प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सुचना दिल्या. तसेच दारव्हाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व येथे करण्यात येणा-या उपाययोजनांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्यासाठी पुढील 14 दिवस जिल्हाधिकारी रोज दारव्हा येथे भेट देणार आहेत. यावेळेस ते येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थिती हाताळणार आहे. यापूर्वी यवतमाळ शहरातील इंदिरा नगर या प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी रोजी भेटी देऊन प्रत्यक्ष फिल्डवर बैठका व आढावा घेतला. त्यामुळेच सद्यस्थितीत यवतमाळ शहर हे कोरोनामुक्त होण्यास मदत झाली.

                                                                         ०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी