जिल्ह्यातील 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


v सलग दुस-या दिवशीही रुग्णसंख्येत वाढ नाही

यवतमाळ, दि. 06 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. सदर रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी प्राप्त झाले. निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये नर्सिंग स्टॉफमधील पॉझेटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) 20 जण, महागाव येथील कोरोनाबाधित मृतकाच्या निकटच्या संपर्कातील तीन जण, एक सारीचा रुग्ण आणि एका प्रिझमटिव्ह केसचा समावेश आहे.

जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाबाधित रुग्ण संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 41 असून येथे एकूण 49 जण भरती आहेत. यात आठ केसेस प्रिझमटिव्ह आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 89 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 2358 नमुने पाठविले असून यापैकी 2270 रिपोर्ट प्राप्त तर 88 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 2116 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 154 पर्यंत पोहचला असून यापैकी 111 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. तर सध्यास्थितीत 41 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहेत. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

00000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी