Posts

Showing posts from June, 2017
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दौरा यवतमाळ ,   दि.   30   :   केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे   आहे. शनिवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ कडे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता वनमहोत्सव फॉरेस्ट पार्क, जांब जनकनगरी जवळ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता राजराजेश्वर सभागृह मुकूटबन, झरी जामणी येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर. दुपारी 12 वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता मुकूटबन येथून वणी करीता प्रस्थान. दुपारी 4 वाजता एस.बी.लॉन, वणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता ईद मिलन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9 वाजता वणी येथून चंद्रपुरकडे प्रयाण. 0000000 वृत्त क्र. 593 वनमहोत्सवाला 4 कोटी वृक्ष लागवडीचे वेध यवतमाळ ,   दि.   30   :   वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परवा वृक्ष लागवडीमध्ये कोणी सहभागी व्हावे   ?   या प्रश्नाच्या उत्तरात... ज्याला जगण्यासाठी ऑक्सीजन हवा, त्या प्रत्येकाने एक
प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने ‘ महाराष्ट्र अहेड ’ चे कौतुक यवतमाळ दि.17 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘ ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया ’ शीर्षकाखालील ‘ महाराष्ट्र अहेड ’ या राज्य शासनाच्या मुखपत्राचे  प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे आज ट्वीट करून कौतुक करण्यात आले आहे.         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनते पर्यंत पोहचविण्यासाठी दर्जेदार मासिक प्रकाशित करण्याची दिर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महासंचालनालयाच्यावतीने माहे मे २०१७ चा विशेषांक काढण्यात आला. मराठी, इंग्रजी, हिंदी,उर्दु, गुजराती या भाषांमध्ये हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ‘ ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया ’ या शीर्षकाने ‘ महाराष्ट्र अहेड ’ हा इंग्रजी भाषेतील अंक प्रकाशित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतदेशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा धांडोळा घेणा-या ‘ महाराष्ट्र अहेड ’ या अंकाचे
तंबाखु नकार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यवतमाळ , दि. 16 : जागतिक तंबाखु नकार दिनानिमित्त तंबाखु विरोधी दिन सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. या अंतर्गत  आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून दंतरोग तज्ञ डॉ.चेतन दरणे व प्रशिक्षक म्हणून डॉ.हिमांशु गुप्ते, डॉ.वैभव थावल उपस्थित होते. डॉ.दरणे यांनी तंबाखु नकार दिन का साजरा केला जातो याची माहिती दिली. डॉ.तगलपल्लेवार यांनी तंबाखु सेवनाचे दुष्परिणाम तसेच यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रकाश टाकला. उपस्थित दोन प्रशिक्षकांनी आपले आरोग्य तंबाखुमुक्त कसे राहतील याबाबत समुपदेशन केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे सागर परोपटे यांनी केले तर आभार मोहित पोहेकर यांनी मानले. 00000 वृत्त क्र. 562 केरोसिनचे जून महि
महाराष्ट्र शासन वृत्त क्र. 557                                         जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                              दि.14/06/20 17 सधन नागरिकांनी स्वे च्‍छेने गॅस सबसिडी सो डावे - सचिंद्र प्रताप सिंह यवतमाळ , दि. 15 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस मिळावा यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये , असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून जिल्‍हयातील सधन व गरज नसेल अशा नागरिकांनी गॅस सबसिडी सोडावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.    गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर , देशभरातील १ कोटी लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातील साडेसोळा लाख नागरिकांनी गॅसचे अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍याचप्रमाणे आपल्‍या जिल्‍हयातील नागरिकांनीही गॅसची सबसिडी सोडवी. जेणेकरून गरजवंत नागरिकांना नवीन गॅसची जोडणी देता येईल. आपली समाजाप्रती असलेली बांधीलकि आणि कर्तव्‍य निभावण्‍याची , जोपासण्‍याची