14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस
        यवतमाळ, दि.12 : 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून जाहिर करण्यात आला आहे. या दिवशी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विविध रक्तदाता जनजागरण कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त द्या, आता द्या, नेहमी द्या हे घोषवाक्य अनुसरुन सकाळी 8 वाजता पोस्टर्स, रांगोळी स्पर्धा तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
            तसेच पोस्टर्स व रांगोळी स्पर्धेकरीता अनुक्रमे प्रथम पारितोषिक 1000, द्वितीय पारितोषिक 600 तर तृतीय पारितोषिक 400 रूपये ठेवण्यात आले आहे. तरी इच्छुक महाविद्यालयीन स्वर्धेकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावे. पोस्टर्स 2 बाय 1.5 फुट या मापातीलच असावे. तसेच ज्या रक्तदात्यांनी पाच किंवा पाचपेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असेल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र रक्तपेढी विभाग वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दिनांक 13 जून पर्यंत सादर करावे. तसेच दिनांक 14 जून रोजी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे व रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तपेढी विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्र.540
अस्थिव्यंग व अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप
        यवतमाळ, दि.12 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दिनांक 16 जून ते 30 जून या कालावधीत अस्थिव्यंग व अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरात ज्या रुग्णांची नोंदणी झालेली आहे व ज्यांच्याकडे पी.आय.नंबर आहे अशा रुग्णांचीच तपासणी करण्यात येईल, असे आवाहन वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्र.541
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या
विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
        यवतमाळ, दि.12 : जिल्हा महिला व बाल विकासांतर्गत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार सन 2016, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 2017 व विशेष नैपुण्य पुरस्कार 2017 करीता जिल्ह्यातील अहर्ताप्राप्त बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व व्यक्तींकडून तीन प्रतीत प्रस्ताव मागविण्यात  आले आहे. तसेच इच्छुकांनी 20 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
            तसेच पात्रतेसाठी राष्ट्रीय निवड समितीमार्फत बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या तीन व्यक्तींची निवड केली जाणार आहे. बालकांचे क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त उल्लेखनिय काम केलेले असणे आवश्यक आहे. बालकांच्या क्षेत्रात गुणवत्तापुर्वक व महत्वाचे काम असणे आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेचे मानधन / वेतन घेणारे व्यक्ती निवडीसाठी पात्र ठरणार नाही. बालविकास, बालसंरक्षण, बालकल्याण या क्षेत्रात उल्लेखनिय व महत्वपुर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय बालकल्याण पुरस्काराकरीता सदर संस्थेस किमान दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच सदर संस्थेस बालकल्याण क्षेत्रातील किमान दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चणा इंगोले यांनी कळविले आहे.
000000



वृत्त क्र.542
कृषी निविष्ठांचे गुणनियंत्रण व तपासणीसाठी भरारी पथके
* तक्रारीसाठी टोल फ्रीवर संपर्काचे आवाहन
            यवतमाळ, दि. 12  :  खरीप हंगामामध्ये बियाणे, खते आणि किटकनाशके यासारख्या निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तराव एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक या प्रमाणे 17 भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे. निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार होवू नये यासाठी पथके काम करणार असून या बाबतीत तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            समस्या व तक्रारीसाठी जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी डी.आर.कळसाईत (9158417482) यांच्या अध्यक्षतेखाली पथक तार करण्यात आले असून या पथकात मोहिम अधिकारी एस.एम.वानखडे (9422168272) यांचा समावेश आहे.
            तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या प्रमुखतेत 16 पथके कार्यरत राहणार आहे. तालुका कृषी अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. यवतमाळ तालुका पथकाचे प्रमुख ए.एस.भवरे 7588188156,  कळंब येथील के.बी.आठवले 9420043683, बाभुळगाव येथील ए.डब्ल्यु.खडसे 9423653623, घाटंजी येथील आर.व्ही.माळोदे 9420688374, पांढरकवडा येथील एन.जी.कोडाली 9422938585, मारेगाव येथील ए.एन.महंत 9404950945, वणी येथील ए.एम.बदखल 9403200681, झरी जामणी येथील डी.बी.गड्डमवार 9403404088, दारव्हा येथील श्री.भरने 8275556537, दिग्रस येथील ए.डी.जाधव 7588589478, नेर येथील पी.आर.ढाकुलकर 9404237116, पुसद येथील पी.एन.राठोड 9028211698, उमरखेड एन.आर.कुमेर 9850279459, महागांव येथील आर.डी.गणवीर 9404087881, आर्णी येथील श्री.पसलवाड 8275165491, राळेगाव येथील एस.जे.पाठक 9404373529 यांच्याशी संपर्क साधावा.
            तसेच यवतमाळ येथील पथक अधिकारी आर.ए.घोंगडे 9822924577, कळंब येथील के.एस.अंबरकर 9404240558, बाभुळगाव येथील एल.के.लखमोड 8275057207,  घाटंजी येथील सुरेश्‍ चव्हाण 9404825987, पांढरकवडा सुरेश चव्हाण 9404825987, मारेगाव जे.के.बेंडे 7350527892, वणी येथील युवराज जंगले 7218597559,  झरी जामणी आर.आर.निलगिलवार 9096322077, दारव्हा येथील आर.डी.शिंदे 9921810289, दारव्हा येथील आर.डी.शिंदे 9921810289, दिग्रस येथील पी.एस.बागडे 9421772026, नेर येथील श्री.सहारे 7507495261,  पुसद येथील एस.के.राठोड 9011928222, उमरखेड येथील जी.एन.गोविंदवार 9021995205, महागांव येथील आर.पी.डाखोरे 9890219569, आर्णी येथील  डी.व्ही.तम्मलवाड 9552676421,  राळेगाव येथील शरद इखे 9765881296 यांच्याशी संपर्क सावाधा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.
000000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी