महाराष्ट्र शासन
वृत्त क्र.557                                जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                         दि.14/06/2017

सधन नागरिकांनी स्वेच्‍छेने गॅस सबसिडी सोडावे
- सचिंद्र प्रताप सिंह
यवतमाळ, दि. 15: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस मिळावा यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये, असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून जिल्‍हयातील सधन व गरज नसेल अशा नागरिकांनी गॅस सबसिडी सोडावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.   
गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर, देशभरातील १ कोटी लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातील साडेसोळा लाख नागरिकांनी गॅसचे अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍याचप्रमाणे आपल्‍या जिल्‍हयातील नागरिकांनीही गॅसची सबसिडी सोडवी. जेणेकरून गरजवंत नागरिकांना नवीन गॅसची जोडणी देता येईल. आपली समाजाप्रती असलेली बांधीलकि आणि कर्तव्‍य निभावण्‍याची, जोपासण्‍याची संधी चालून आलेली आहे. याचा स्विकार करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण नागरिकांनी ठेवावे.
नागरिकांनी सोडलेल्‍या गॅस सबसिडीतून जिल्‍हयातील ज्‍यांच्‍याकडे गॅस जोडणी नाहीत त्‍यांना प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजनेतून गॅस जोडणी देण्‍यात येणार आहे. यातून आजही चुलीवर स्‍वयंपाक करणा-या कुटुंबांची मुक्‍तता होणार आहे. आपल्‍या सबसिडी सोडण्‍याच्‍या एका विचाराने चुलीवर स्‍वयंपाक करणा-या महिलांना धुरापासून सुटका मिळणार आहे. पर्यायाने त्‍यांना उदभणा-या आजारापासूनही मुक्‍तता मिळणार आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील सधन व गरज नसलेल्‍या नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
000000
वृत्त क्र.558
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 15 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अनुदान व बिज भांडवल योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महामंडळाच्यावतीने अनुदान योजना, बिज भांडवल योजनेंतर्गत मुदत कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. सदर योजनेसाठी मांग, मातंग, मांग-गारोडी, मादगी व तत्सम समाजाच्या कर्जदारांनी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प यवतमाळ येथील महामंडळाच्या कार्यालयात 14 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
000000
वृत्त क्र.559
महिला लोकशाही दिनाचे आयोजन
        यवतमाळ दि.15 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्या म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येत असते. त्यानुसार सोमवार दिनांक 19 जून रोजी बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
          ज्या महिलांना लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी बचत भवन येथे तक्रारी दाखल कराव्यात. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, यवतमाळ यांनी कळविले आहे. ज्या महिलांचे तालुकास्तरावर लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाहीत त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात. तक्रार सादर करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर केलेला अर्ज व टोकन क्रमांकही दाखल करावा, असे कळविण्यात आले आहे.
000000
वृत्त क्र.560
व्यवसाय परिक्षेचा निकाल जाहिर
        यवतमाळ दि.15 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्रातून शिकाऊ उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या व्यवसाय परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे.
            सदर केंद्रावर एप्रिलमध्ये शिकाऊ उमेदवारांची 105 वी अखील भारतीय व्यवसाय परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षा दिलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांच्या निकाल घोषित झाला आहे. सदर प्रशिक्षणार्थी आपला निकाल बिटीआरआर कार्यालय यवतमाळ येथून घेवून जावू शकतात. अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थी येत्या 23 जून रोजी पर्यंत पुरवणी परिक्षेकरीता अर्ज करू शकतात, असे केंद्राच्या अंशकालीन प्राचार्यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी