Posts

Showing posts from February, 2018

पुढील हंगामाच्या कर्ज वाटपासाठी बँकांनी आतापासून नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v 2018-19 साठी 2 हजार 710 कोटींचे कृषी पतपुरवठा धोरण             यवतमाळ , दि. 28 : यावर्षी झालेल्या अपु-या पावसामुळे तसेच दुष्काळ, गारपीट आणि बोंडअळीमुळे कृषीक्षेत्र प्रभावीत झाले. आता पुढील हंगाम येत आहे. या हंगामात शेतक-यांना पीककर्ज वाटपासाठी बँकांनी आतापासून नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी पतपुरवठा धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रवीण मेश्राम, सहकारी संस्थेचे उपनिबंधक गौतम वर्धन, अग्रणी बँक व्यवस्थापक कैलास कुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.             पुढील हंगामातील बँकांची काय तयारी आहे, अशी विचारणा करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, यावर्षी कर्जमाफीमुळे शेतक-यांचे कर्ज माफ झाले आहे. पुढील हंगामात पात्र शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच नवीन शेतकरी सभासद करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबतच इतर राष्ट्रीयकृत बँकांनीसुध्दा कर

मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v   मराठी भाषा गौरव दिन, सुलेखन तथा भू-अलंकरण प्रदर्शनी यवतमाळ , दि. 27 : मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. मराठी ही लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजेचे असून तीच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन तसेच संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. भराडी, माहिती व सुचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर, प्रदर्शनीच्या संयोजिका राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.             विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे सांगू

जिल्हाधिका-यांनी घेतली शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक

Image
यवतमाळ , दि. 18 : जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांर्तगत स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी उद्योजगता विकास प्रकल्पाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच घेतली. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. नेमाडे, कृषी पणन तज्ज्ञ जगदीश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतक-यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच धान्य मुल्यवर्धन, प्रक्रिया करणे व बाजाराभिमुख शेतमाल उत्पादीत करून शेतक-यांना सामूहिक सुविधा केंद्राचा लाभ द्यावा. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी धान्य स्वच्छता व प्रतवारी करण्याचे युनिट सुरू करून दिलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व उद्योजगता विकासाबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांच्या अडीअडचणी, बळकटीकरण, विविध परवाने, विद्युत पुर

धडक विहिरींमुळे शेतापर्यंत सिंचनाची सोय - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 17 : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वाभिमानाने उभा राहण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहिर अशा अनेक योजनांची प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक तालुक्याला 300 याप्रमाणे जिल्ह्यात 4 हजार 800 धडक सिंचन मंजूर झाल्या आहेत. ख-या अर्थाने या विहिरींमुळे शेतापर्यंत सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शेतक-यांना विहिरींचे कार्यारंभ आदेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर पंचायत समिती सदस्य नरेश ठाकूर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते.             धडक सिंचन विहीर हा राज्य शासनाने फ्लॅगशीप कार्यक्रम म्हणून हाती घेतला आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या विहिरी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी शेतक-यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात कालवे, पाटस-या, मायनर, सब मायनर आदींच

निकषात बसणा-या सर्व शेतक-यांना कर्जमाफी - सहकार मंत्री सुभाष देशमुख

Image
v अनावधानाने सुटलेल्या शेतक-यांचेसुध्दा अर्ज स्वीकारण्याचे निर्देश v जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक यवतमाळ , दि. 17 : शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 78 हजार 831  शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची 890.79 कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा करण्यात आली आहे. अनावधानाने जे शेतकरी यातून सुटले आहेत, अशा शेतक-यांचे अर्ज स्वीकारावे. तसेच 2009 पासून निकषात बसणा-या सर्व      शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.             नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, अमरावती विभागाचे विभागीय सहनिबंधक राजेश दाभेराव, लेखा परिक्षण विभागाचे सहनिबंधक जे.व्ही. घुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्याची टीम रवाना यवतमाळ , दि. 6 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी “ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ” ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.             “ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ” प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील पहिली टीम आज (दि.6) रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवितांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, डॉ. नितीन खर्चे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, तालुका समन्वयक समाधान इंगळे, आश्विनी गवारे, आगार व्यवस्थापक एस.बी. डफळे आदी उपस्थित होते.             वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील 9 गावातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्य