जिल्हाधिका-यांनी घेतली शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक

यवतमाळ, दि. 18 : जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांर्तगत स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी उद्योजगता विकास प्रकल्पाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच घेतली.
बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. नेमाडे, कृषी पणन तज्ज्ञ जगदीश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतक-यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच धान्य मुल्यवर्धन, प्रक्रिया करणे व बाजाराभिमुख शेतमाल उत्पादीत करून शेतक-यांना सामूहिक सुविधा केंद्राचा लाभ द्यावा. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी धान्य स्वच्छता व प्रतवारी करण्याचे युनिट सुरू करून दिलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व उद्योजगता विकासाबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांच्या अडीअडचणी, बळकटीकरण, विविध परवाने, विद्युत पुरवठा आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यासह 13 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व उद्योजगता विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी