Posts

Showing posts from September, 2023

उद्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान

Image
पालकमंत्री संजय राठोड व आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती ; दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली ; जिल्ह्यामध्ये 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' अभियानांतर्गत शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी लोहारा एमआयडीसीतील चिंतामणी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ‘दिव्यांग मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री संजय राठोड तर उद्घाटक म्हणून अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उपस्थित राहणार आहे. सोबतच वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.ॲड निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धिरज लिंगाडे, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदिप सुर्वे, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सकाळी ९ वाजतापासून दिव्यांग नोंदणी आणि अर्ज भरले जाणार असू

दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू यांचा दौरा कार्यक्रम

Image
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उद्या शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता लोहारा एमआयडीसी येथील चिंतामणी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता जामवाडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी भेट देतील. सायंकाळी ५ वाजता यवतमाळ शहरातील आझाद मैदान येथे कंत्राटी भरती रद्द बाबतच्या उपोषणास भेट देतील. सायंकाळी ५.३० वाजता समर्थवाडी, नप शाळा क्रमांक १९ येथील नंददिप फाऊंडेशन मनोरुग्ण आश्रमास भेट देतील.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते १० लाखाच्या विमा रक्कमेचे वितरण

Image
केवळ ३९६ रुपयात विमा संरक्षण ; कुटुंबियास मिळाले १० लाख रुपये ; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा उपक्रम ; केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वित्तीय समावेशन योजनेंतर्गत भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यावतीने अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. केवळ ३९६ रुपयात १० लाखाचे सुरक्षा कवच योजनेने दिले आहे. या योजनेंतर्गत विमा घेतलेल्या आणि अपघाती निधन झालेल्या यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील चक्रधर मानकर यांच्या कुटुंबियास जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते १० लाखाचा धनादेश देण्यात आला. बजाज अलियांझ आणि टाटा एआयजीच्या सहकार्याने एक वर्षापूर्वी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण भागात विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, मजूर मोठ्या संख्येने योजनेत सहभाग घेत आहे. हा अपघात विमा अवघ्या ३९६ रुपयामध्ये सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विमाधारकाचा अपघातामुळे मृत्यू, पूर्ण अपंगत्व, अर्धांगवायू झाल्यास १० लाखापर्यंत क्लेम बहाल केला जातो. किरकोळ अपघातात दुखापत किंवा फ्रॅक्चर इत्यादी घटना घडल्यास ओपीडी तसेच आयपीडी उपचारासाठी देखील खर्च मिळतो.

अवैध ताडी, हातभट्टीवर उत्पादन शुल्क विभागाचे छापे

Image
एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल ; जिल्ह्यातील अवैध ताडी व हातभट्टी दारु निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात बुधवारी दि.२७ सप्टेंबर रोजी तारपुरा, रातचांदना शिवार आणि वडगाव रोड येथे राज्य उत्पादन शुल्क कडून छापे टाकण्यात आले. या कारवाईत मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सहा आरोपींविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून १०० लिटर ताडी, ११ लिटर देशी व विदेशीदारु, १३२ लिटर हातभट्टी दारु, ६०० लिटर मोहफुल सडवा तसेच एक फ्रिज, दोन दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण एक लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संतोष भटकर, दुय्यम निरीक्षक धमेंद्र त्रिपाठी, प्रभारी निरीक्षक डी.ओ.कुटेमाटे, दुय्यम निरीक्षक गणेश कसरे, चंद्रशेखर दरोडे, प्रगती मांडवधरे, चंद्रकांत नागुलवाड, दिगांबर नेवारे तसेच कर्मचारी अविनाश पोंदेर, महेश खोब्रागडे, दिनेश पेंदोर, प्रविण मसराम, अमोल बो

मजीप्राच्या अभय योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Image
नळधारक ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरीता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार (व्याज) माफी सवलतीच्या अभय योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नळधारक ग्राहकांनी या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मजीप्राच्या जलव्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व नळधारक ग्राहकांना दि.३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाणी देयकावरील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेस मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या सर्व ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेत सहभागी व्हावे. या योजनेचा कालावधी दि ३१ ऑक्टोबरला संपुष्टात येणार असल्यामुळे तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग अधिकाऱ्यांकडून अति सघन कापूस लागवड प्रकल्पांची पाहणी

जिल्ह्यात सुमारे ४६४ एकर क्षेत्रावर प्रकल्प सुरू : कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आयसीएआर, सीआयसीआर आणि केव्हीकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अति सघन लागवड पद्धती प्रकल्पांतर्गत कळंब तालुक्यातील आमला आणि राळेगाव तालुक्यातील जळका, श्रीरामपूर येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्र भेटी देवून पाहणी केली. कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पीक उत्पादन वाढीसाठी अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पामध्ये कमी क्षेत्रात झाडांची संख्या वाढून योग्यरित्या नियोजन करून पिकाच्या उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. हा प्रकल्प जिल्ह्यामध्ये यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, कळंब आणि नेर तालुक्यामध्ये जवळपास ४६४ एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. या भेटी दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता वर्मा, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रमुख डॉ. ए. एस. तायडे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सीएमडी ललित कुमार गुप्ता, अकोला येथील भारतीय कापूस महामंडळाचे एजीएम नीरज कुमार, कृषी विज्ञान क

जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Image
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय तसेच आर्णीतील उमरी पठार येथील संत श्री दोला महाराज वृध्दाश्रम यांच्यावतीने संत श्री. दोला महाराज वृध्दाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच जेष्ठांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या शिबीरास तसेच जेष्ठांकरिता आयोजित कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी 143 कोटींचा निधी - संजय राठोड

Image
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र स्वयंसहाय्यता गटांना वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मंत्री श्री.राठोड म्हणाले, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण केंद्र राज्य शासन अनुक्रमे 60 ल 40 टक्के असे असून, योजनेचे प्रकल्प मूल्य 1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत

विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने कर्ज द्या - डॅा.पंकज आशिया

Image
Ø जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा ; Ø आतापर्यंत 1 हजार 936 कोटीचे कर्ज वाटप ; Ø 1 लाख 88 हजार शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ ; केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेत शासन अनुदानासह बॅंकेच्या कर्जाचाही समावेश असतो. विभागांकडून लाभार्थ्यांचे प्रस्ताव बॅंकांना पाठविल्यानंतर बॅंकांनी ते प्रस्ताव मंजूर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, रिजर्व बॅंकेचे अग्रणी बॅंक प्रबंधक राजकुमार जयस्वाल, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिपक पेंदाम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, सामाजिक न्यायचे सहाय्यक आयुक्त नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये, माविमचे जिल्हा समन्वयक रंजन वानखडे यांच्यासह विविध विभाग व बॅंकाचे जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थित होते. यावेळी

सोयाबीन पिकाची शास्त्रज्ञ व कृषि विभागाकडून संयुक्त पाहणी

Image
शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन केले मार्गदर्शन ; सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची अमरावती येथील प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे पथक आणि कृषी विभागाने सोमवारी संयुक्त पाहणी केली. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण व मार्गदर्शन केले. या पथकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अधिनस्त प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती येथील डॉ. वर्षा टापरे, डॉ.निचळ, डॉ. मुंजे, डॉ. घावडे, डॉ. दांडगे तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, डॉ.विपुल वाघ, डॉ.वसुले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांचा समावेश होता. यवतमाळ तालुक्यातील हिवरी व खरोला, आर्णी तालुक्यातील जवळा, महागाव तालुक्यातील दहीसावाळी व आंबोडा तसेच उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी व सुकळी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण केले. ऑगस्ट महिन्यात पावसात पडलेला खंड, वाढलेले तापमान, अन्नद्रव्याची कमतरता, त्यानंतर सततचा पाऊस अशा विविध कारणांमुळे सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव, चारकोल रॉट व मुळकुज तसेच पिवळा मोझ

आझाद मैदान येथे स्वेटर दुकानासाठी कालबध्द कार्यक्रम

शहरातील आझाद मैदान येथे स्वेटर दुकानासाठी खुली जागा मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकियेदरम्यान अधिकाधिक पारदर्शकता राखणे तसेच प्रकियेमध्ये सहभागी होण्याची पुरेशी संधी संबंधितांना मिळावी व शासनास तसेच मैदानांच्या देखभालीसाठी योग्य प्रमाणात महसूल प्राप्त व्हावा, याअनुषंगाने दि 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रक्रिया अटी व शर्तीला अधिन राहून राबविण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या sdoyavatmal.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जच स्विकारण्यात येईल.अर्जासोबत नगर परिषदचे नाहरकत प्रमाणपत्र, चरित्र प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत आणि चार फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावे. या कागदपत्रासह अर्जाच्या तीन प्रती या कार्यालयास अर्ज केल्यानंतर तीन दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक राहिल. इतर सर्व विस्तृत माहिती आणि अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसिलदार कार्यालय, नगर परिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहे.

शासन जमा मिळकतीचा जाहीर लिलाव

शासन जमा करण्यात आलेल्या मिळकतीची जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. या जाहीर लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यवतमाळचे तहसिलदार यांनी केले आहे यात सुरेशकुमार व्यंकटेश्वरलू गोस्टू प्रोप्रा. व्यंकटेश्वर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रा. जीई-६, बिझनेस प्लाझा, दत्त चौक, यवतमाळ यांची मौजा-यवतमाळ येथील शिट नं. ३८ सी प्लॉट नं. ३८ दुकान नं. ६ क्षेत्र १७० चौ फुट वर्णनाची मिळकत जेथे आहे जशी या तत्वावर असून ती शासन जमा करण्यात आलेली आहे. त्यास्वरुपात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक नागरीकांनी या मालमत्तेची स्वतः स्थळ पाहणी करून घ्यावी व यवतमाळच्या तहसिल कार्यालय येथे दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर लिलावात सहभाग घेण्यास उपस्थित राहावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालयातील नायब नाझर यांच्याकडे उपलब्ध आहेत, असे तहसिलदार यांनी कळविले आहे.

आदिवासी योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. परंतु लाभ मंजूर होऊनही कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची 8 ऑक्टोबरपर्यंत पूर्तता करावी, असे आवाहन पांढरकवडा एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात शेळीगट, बियाण्यासाठी अर्थसहाय्य, तुषार सिंचन, ताडपत्री तसेच आदिवासी मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलसाठी अर्थसहाय्य अशा विविध स्वरूपाच्या योजनांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ रोख रकमेच्या स्वरूपात डीबीटीद्वारे देण्यात येतो. योजनेचा लाभ प्रथम हप्ता 75 टक्के व साहित्याची खरेदी केल्यानंतर 25 टक्के देण्यात येते. तसेच आदिवासी लाभार्थी प्रथम हप्त्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेचे विवरण आवश्यक आहे. यासाठी बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स लाभार्थी आणून देत नाहीत. काही लाभार्थी पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी साहित्य खरेदी केल्याची बिले, पावती आणून देत नाहीत. अशा का

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबरला

Image
महात्मा गांधी जयंती दिनी शासकीय सुट्टी असल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती येत असल्यामुळे या दिवशी लोकशाही दिन सभेचे आयोजन होणार नाही. त्याऐवजी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी बळीराजा चेतना भवन, (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेत जनतेच्या तक्रारी किंवा गाऱ्हानी ऐकून त्या स्विकारुन कार्यवाही करण्यात येणार आहे.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रम 29 सप्टेंबरला

जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगार कार्ड वितरीत होणार : जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ज्या दिव्यांग व्यक्तीकडे एम्प्लॉयमेंट कार्ड (रोजगार कार्ड) नाहीत अशा 18 ते 55 वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना दि. 29 सप्टेंबर रोजी एम्प्लॉयमेंट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगार कार्ड वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता दिव्यांग उमेदवारांनी शिबिराच्या दिवशी स्वतः चे आधारकार्ड, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी), अंतिम वर्षाची गुणपत्रिका, भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी आवश्यक त्या कागदपत्रांसह चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती (खाजगी) एमआयडीसी लोहारा,यवतमाळ येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली असून अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे आता शासनाकडून सोमवार दि. ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्याची तसेच सन २०२१-२२ पा शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील पात्र सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा संपन्न

Image
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज जिल्हाधिकारी तथा परिषदेचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मागील सभेतील ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला व त्या लवकरात लवकर निकाली काढून त्याचा कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच आज झालेल्या सभेतील तक्रारी प्राप्त झाल्यापासून सात दिवसात निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात ही बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, अन्न औषध प्रशासन, महावितरण, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी तसेच समितीमधील अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे, ॲङ राजेश पोहरे, शेखर बंड, प्रमोदकुमार बाजोरीया, बिरेद्र चौबे, कैलासचंद्र वर्मा, संतोष डोमाळे, प्रकाश बुटले आदी उपस्थित होते. यावेळी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मुलन मोहीम

Image
> अवैध हातभट्टी दारु, पाच हजार लिटर मोहफुल सडवा नष्ट ; > १७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही ; > धाबा मालकासह अवैधरित्या दारु पिणाऱ्यांवर गुन्हे ; जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष हातभट्टी निर्मुलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कळंब तालुक्यातील कळंब माथा, पारधी बेडा, कळंब आणि चिंचोली गावातील अवैध हातभट्टीच्या ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारु व पाच हजार लिटर मोहफुल सडवा, दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून हातभट्टीची ठिकाणे उध्वस्त करण्यात आले. ही कार्रवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्रवाईत भरारी पथकाचे निरीक्षक संतोष भटकर, कळंबच्या पोलीस निरीक्षक दिपमाला भेंडे, दुय्यम निरीक्षक धमेंद्र त्रिपाठी, डि.ओ कुटेमाटे, चंद्रशेखर दरोडे, प्रिया बाभुळकर, सजंय बोडेवार, निलेश वानखेडे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, सुभाष चौधरी तसेच ए.ए. पठा

गॅस एजन्सीने जास्त पैसे घेतल्यास ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन

गॅस वितरण एजन्सीने ग्राहकांकडून विक्रीमूल्यापेक्षा जास्त पैसे घेणे, पावती न देणे यासारख्या अनियमितता निदर्शनास आल्यास त्याविरोधात ग्राहकांनी सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व तेल कंपनीमार्फत दरमहा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर गॅसचे दरपत्रक प्रसिद्ध केले जातात. तसेच सर्व गॅस एजन्सीद्वारे गॅसचे दरपत्रक दर्शनी भागात लावून गॅस निर्धारित दरात वितरित करणे बंधनकारक आहे. गॅस एजन्सीमार्फत बुकिंग केल्यानंतर अधिकृत विक्री दरापेक्षा जादा पैसे देऊ नये. तसेच गॅस वितरणानंतर पावतीचा आग्रह करावा. गॅस वितरण एजन्सीने ग्राहकाकडून विक्रीमूल्यापेक्षा जास्त पैसे घेणे, पावती न देणे यासारख्या अनियमितता घडल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात ग्राहक सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करु शकतात. तक्रार निवारणकरिता टोलफ्री क्रमांक 18002333555 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी जिल्ह्यातील सर्व गॅस धारकांना केले आहे.

यवतमाळ आयटीआयचे दोन प्रशिक्षणार्थी देशात पहिले

Image
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थीं साठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. या परीक्षेचे निकाल घोषित झाले असून वायरमन व्यवसायात यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भुमिका पडयाळ हिने मुलींमधून आणि अभिमन्यु उचाडे याने मुलांमधून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी दिली. डिजीटी नवी दिल्लीअंतर्गत एनसीव्हीटीद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रशिक्षणार्थीसाठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्था दरवर्षी नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. या संस्थेची प्रवेश क्षमता ६८० असून यावर्षी शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर १५ मेरीट मुलापैकी १० मेरीट या संस्थेतील आहेत. या यशामध्ये संस्थेतील शिल्प निदेशक आर आर डोमाळे, इतर सर्व कर्मचारी व प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांचे विशेष योगदान लाभले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध ; सात दिवसात आक्षेप सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
मतदान केंद्राच्या प्रारूप मतदार याद्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर काल प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारूप यादीबाबत आक्षेप असल्यास सात दिवसात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 76- वणी, 77- राळेगांव, 78- यवतमाळ, 79- दिग्रस, 80- आर्णी, 81- पुसद, 82- उमरखेड या विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. या मतदार नोंदणी अंतर्गत मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने १५०० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार केंद्राच्या बाबतीत मतदान केद्रांचे विभाजन करून अथवा मतदार इतर मतदान केद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणामध्ये बदल झालेले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव

Image
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे विश्वकर्मा जयंतीदिनी संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वाटपाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डी.पी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड येथील गावंडे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. एस. आर. वद्राबाद, समर्थ फैब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल रामेश्वर बिच्चेदार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश जी. शिंदे, पालक प्रतिनिधी संजय शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक आणि फिटर या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तसेच वेल्डर, डिझेल मेकॅनिक, पत्रे कारागीर, ड्रेस मेकिंग व बेसिक कॉस्मेटोलॉजी या एक वर्षीय व्यवसायामधील जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बोर्ड प्रमाणपत्राचे वितरण हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी

कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय शिवार फेरी

> शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळणार ; > ५० हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित ; > खरीप पिक उत्पादन तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक ; > कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने, संधीवर चर्चासत्र ; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापन दिनाचे औचित्य साधून अकोल्यातील मुख्यालय येथे यावर्षी दि. २९ ते १ ऑक्टोबर २०२३ या तीन दिवसीय कालावधीत विद्यापीठ शिवार फेरी आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विद्यापीठाद्वारे या शिवार फेरी आणि थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिवार फेरीचे जिल्हानिहाय कार्यक्रम ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी अकोला, वाशीम, बुलढाणा व अमरावती शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार दि ३० सप्टेंबर रोजी वर्धा, यवतमाळ, गडचिरोली व गडचिरोली, रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये ही शिवार फेरी होणार आहे. या शिवार फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची दि. २९, ३० सप्टेंबर व दि. १ ऑक्टोबर या कालावधीत द

दारव्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध - संजय राठोड

Image
> छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दारव्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. येणाऱ्या काळात दारव्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दारव्हा नगरपरिषदेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, लोकशाहीर नंदेश उमप, जिपच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार आदी उपस्थित होते. दारव्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही दारव्हावासियांची मागणी होती. अनेक वर्षापासूनची ही मागणी आज पूर्ण झाली. येथील बोदेगाव साखर कारखान्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी लवकरच शेतकरी मेळावा आयोजित केला जाणार आहे. दारव्ह्यातील प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि समृद्धी यावी यासाठी सात

होतकरू तरुणांना 15 लाखापर्यंत कर्ज, 3 लाखापर्यंत परतावा

Image
Ø मराठा प्रवर्गातील उमेदवारांना लाभ ; Ø वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील होतकरू युवकांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने गट प्रकल्प योजनेप्रमाणेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेतून 15 लाखापर्यंत कर्ज दिले जातात. विशेष म्हणजे या कर्जावर 3 लाखापर्यंत परतावा करण्यात येतो. वैयक्तीक परतावा योजनेंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी पुर्वी 10 लाखापर्यंत कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा 15 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्जातून मोठ्या स्वरूपाचे व्यवसाय होतकरू युवक उभारू शकतात किंवा अस्तित्वातील व्यवसासाची वाढ करता येऊ शकते. उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने 12 टक्के दराने दरसाल दरशेकडा याप्रमाणे व्याज सवलत दिली जाते. ही सवलत 12 टक्के किंवा जास्तीत जास्त 3 लाखाच्या मर्यादेपर्यंत मंजूर केली जाते. व्याज परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ

आदिवासी लाभार्थ्यांसाठी च्या योजनांची माहिती देण्याऱ्या चित्ररथाचे उद्घाटन

Image
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतील नाविन्यपूर्ण योजनेमधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद कार्यालयांतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहिती देण्यासाठी चित्ररथाचे उद्घाटन सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्ररथामार्फत पुसद प्रकल्पांतर्गत पुसद, दिग्रस, दारव्हा, महागाव, उमरखेड, आणि व नेर या सात तालुक्यांमधील आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प, पारधी विकास योजना, स्वाभिमान सबळीकरण योजना, प्रधानमंत्री वनधन केंद्र योजना, आदि आदर्श ग्रामविकास योजना, कन्यादान योजना, शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहे योजना, नामांकीत इंग्रजी माध्यम आश्रमशाळा अशा विविध योजनांविषयीची माहिती आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना मुंगसाजी शेड्युल ट्राईल बहुउद्देशिय संस्था, आडगांव ता. पुसद यांच्यामार्फत राबविण्यात य

बोदेगावात आज जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन ; जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे उद्या दि.२१ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते सकाळी १० वाजता होईल. या कार्यक्रमास खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आमदार ॲड.निलय नाईक, आ.किरण नाईक, आ. धिरज लिंगाडे, आ.प्रा.डॅा. अशोक उईके, आ.मदन येरावार, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॅा. संदीप धुर्वे, आ. नामदेव ससाने, आ इंद्रनिल नाईक तसेच जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड व इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. एकरी शंभर टन उत्पादन घेणारे कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. संजीव माने हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील नागरिक, शेतकऱ्यांनी या जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक व जिल्हा अधीक्षक कृषि अ

आयुष्मान भव : मोहीम, पालकमंत्र्यांच्या हस्ते आयुष्मान कार्डचे वाटप

Image
केंद्र शासनाच्या आयुष्मान भव: मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या मोहिमेंतर्गत नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यास सुरुवात झाली असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कार्डचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित आयुष्मान कार्ड वितरण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ पी. एस ठोंबरे उपस्थित होते. यावेळी बंटी श्रीवास, सचिन चुटे या नागरिकांना आयुष्मान कार्डचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आरोग्य मेळावा, अवयवदान जागृती, १८ वर्षावरील पुरूषांची आरोग्य तपासणी, आयुष्मान गाव सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान आयुष्मान भव: सेवा पंधरवाडा राबवून जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड काढण्यात येणार आहेत. तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेविषयी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आरो

दारव्हा शहर पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करा - संजय राठोड

Image
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिले दिले. दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रगती आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, दारव्हा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गट विकास अधिकारी राजीव शिंदे आदी उपस्थित होते. या पाणी पुरवठा योजनेच्या दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत दारव्हा शहर पाणी योजनेची ३१ कोटी २४ लाख रुपये किंमतीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा कंत्राटदार मे.इंद्रायणी कंस्ट्रक्शन, औरंगाबाद यांना अंदाजपत्रकीय

सेवा महिन्यात नागरिकांच्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करा - डॉ.पंकज आशिया

Image
सेवा महिना अंमलबजावणीचा घेतला आढावा ; महिन्यात 25 प्रकारच्या सेवा, योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासोबतच त्यांना कालमर्यादेत विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी दि.16 ऑक्टोंबरपर्यंत सेवा महिना विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासोबतच त्यांना विविध योजनांचा लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा महिना अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते. सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल याठिकाणी प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सेवा महिना कालावधीत पीएम किसान सन्मान निधी यो

बाभुळगाव येथे मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम

Image
आ.डॉ.अशोक उईके यांची उपस्थिती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त राबविण्यात येत असलेल्या टप्पा दोनचा गावस्तरीय शुभारंभ बाभुळगाव येथे आ.डॅा.अशोक उईके यांच्या हस्ते झाला. अभियानाच्या या टप्प्यात गावस्तरावर मातीचे संकलन करून त्याचे कलश तालुकास्तरावर पोहोचविले जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानाचा दुसरा टप्पा दिनांक 1 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा शुभारंभ आ.डॅा.उईके यांच्याहस्ते झाला. बाभुळगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तहसिलदार मिरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका वैद्यकिय अधिकारी, डॉ.क्रांतीकुमार नावंदीकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पुडके, कृषि अधिकारी श्रीमती चव्हाण, पंचायत समितीतील पंचायत, आरोग्य, कृषि, शिक्षण या विभागांचे सर्व विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीस्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते. अभियानांतर्गत गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या उपक्रमाबाबत डॉ.उईके यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. आयुष्यमा

वैयक्तीक व्याज परतावा योजनेने व्यवसाय, उत्पन्न वाढले

Image
Ø पाच होतकरू युवकांना मिळाला रोजगार ; Ø कर्जावर 12 टक्के दराने मिळाली सवलत मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. दिग्रस येथील एका होतकरू युवकाने या योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायात वाढ तर केलीच शिवाय पाच युवकांना त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातीस उमेदवारांना हक्काचा उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. महामंडळाच्या या योजनेतून उद्योग, व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केल्यास महामंडळ अशा लाभार्थ्यांस घेतलेल्या कर्जावर दरसाल दरशेकडा 12 टक्के दराने व्याजाचा परतावा करते. दिग्रस येथील सौरव मारोतराव मोरे यांचे शहरात मोबाईल शॅाप होते. त्यांना आपल्या या शॅापला शोरुमध्ये रुपांतरीत करून व्यवसाय वाढ

दारव्हात सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकामाचे भूमिपूजन

Image
दारव्हा नगरपरिषद हद्दीतील जुन्या बचत भवनाच्या क्षतीग्रस्त इमारतीच्या जागेवर सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे आदी उपस्थित होते. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकाम केले जाणार आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ६५६ इतकी आहे.

दिग्रसच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार - संजय राठोड

Image
दिग्रसमध्ये ७ कोटी ६३ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाच्या कामांसह भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. या ७ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव सुपारे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय बंग, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे, तहसिलदार सुधाकर राठोड आदी उपस्थित होते. दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. या विकास आराखड्याच्या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार आहे. मागच्या काळात विविध विकासकामे केले आहेत. येणाऱ्या काळात शहरामध्ये भूमिगत विद्युत व्यवस्था, प

अमृत कलश यात्रा काढतांना लोकसहभागावर भर द्या - डॅा.पंकज आशिया

Image
Ø ‘मेरी माटी, मेरा देश’ टप्पा दोनला सुरुवात ; Ø प्रत्येक गावात निघणार ‘अमृत कलश’ यात्रा ; Ø गावागावातून होणार माती, तांदुळचे संकलन ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेद्वारे घराघरातून मातीचे संकलन केले जात आहे. यात्रेत गावातील नागरिकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलेश यात्रेचे आयोजन करून मातीचे संकलन करण्यात येत आहे. या यात्रेचे आतापर्यंत झालेले काम व पुढील तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास चंदनकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ‘मेरी माटी, मेरा देश’ अ

सण उत्सव एकोपा व शांततेत साजरे करावेत - डॉ. पंकज आशिय

Image
उमरखेड येथे शांतता समितीची बैठक आगामी काळातील पारंपरिक सण, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण, उत्सव सर्वांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. पोलिस प्रशासनामार्फत उमरखेड येथील नगरपरिषद सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात झाली. यावेळी आ.नामदेव ससाणे, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार डॉ.आनंद देऊळगांवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे आपले पारंपरिक उत्सव आहे. हे उत्सव साजरे करतांना सलोखा बाळगणे फार महत्त्वपूर्ण आहे. या उत्सवादरम्यान अनूचित प्रकार घडू नये. आपसात तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हे सर्व सण एकोप्याने साजरे करावे. रस्त्यावरील खड्डयांचे काम सणांच्या अगोदर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिक

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ : व्यवसाय कर्जावर 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत

Image
Ø गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना Ø मराठा समाजातील उमेदवारांना लाभ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने प्रामुख्याने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गाकरीता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यातील गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर महामंडळाच्यावतीने 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत दिली जाते. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन उद्योग, व्यवसाय स्थापन करणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींनी व्यवसाय सुरु केल्यास 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तीन व्यक्तींच्या व्यवसायासाठी 35 लाख, चार व्यक्तींच्या व्यवसायासाठी 45 लाख तर पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय स्थापन केल्यास 50 लाखापर्यंत योजनेंतर्गत बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने 12