यवतमाळ आयटीआयचे दोन प्रशिक्षणार्थी देशात पहिले

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थीं साठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. या परीक्षेचे निकाल घोषित झाले असून वायरमन व्यवसायात यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भुमिका पडयाळ हिने मुलींमधून आणि अभिमन्यु उचाडे याने मुलांमधून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी दिली.
डिजीटी नवी दिल्लीअंतर्गत एनसीव्हीटीद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रशिक्षणार्थीसाठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्था दरवर्षी नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. या संस्थेची प्रवेश क्षमता ६८० असून यावर्षी शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर १५ मेरीट मुलापैकी १० मेरीट या संस्थेतील आहेत. या यशामध्ये संस्थेतील शिल्प निदेशक आर आर डोमाळे, इतर सर्व कर्मचारी व प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांचे विशेष योगदान लाभले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतूक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी