लोकशाही दिनातील प्रकरणे निकाली काढा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

१७२ तक्रारी प्राप्त : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण १७२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिकांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेत त्यांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती