बोदेगावात आज जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन ; जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे उद्या दि.२१ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते सकाळी १० वाजता होईल.
या कार्यक्रमास खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आमदार ॲड.निलय नाईक, आ.किरण नाईक, आ. धिरज लिंगाडे, आ.प्रा.डॅा. अशोक उईके, आ.मदन येरावार, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॅा. संदीप धुर्वे, आ. नामदेव ससाने, आ इंद्रनिल नाईक तसेच जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड व इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. एकरी शंभर टन उत्पादन घेणारे कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. संजीव माने हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील नागरिक, शेतकऱ्यांनी या जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन, शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी