शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा संघटनांची सभा 14 सप्टेंबरला

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषदे द्वारा आयोजित दरवर्षी विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा विविध शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या सत्रातील क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता जिल्ह्यातील विना अनुदानित खेळ प्रकाराच्या संघटनांची पदाधिकाऱ्यांच्या सभेचे 14 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोधनी रोड, यवतमाळ येथे सकाळी 11. 30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. या सभेस संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची घटना व नोंदणी प्रमाणपत्र, राज्य संघटनेची संलग्नता (चालू वर्षाची), खेळाची नियमावली व दस्तऐवज घेऊन उपस्थित रहावे. या वर्षातील विविध स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करावयाचे असल्याने या सभेस संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य इत्यादींची वरील दस्तऐवजासह उपस्थिती अनिवार्य राहील. त्या शिवाय जिल्हास्तरीय स्पर्धा ऑनलाइन कार्यक्रमात समावेश करण्यात येणार नाही व त्या खेळाची नोंद न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संघटनेची राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी