आदिवासी लाभार्थ्यांसाठी च्या योजनांची माहिती देण्याऱ्या चित्ररथाचे उद्घाटन

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतील नाविन्यपूर्ण योजनेमधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद कार्यालयांतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहिती देण्यासाठी चित्ररथाचे उद्घाटन सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्ररथामार्फत पुसद प्रकल्पांतर्गत पुसद, दिग्रस, दारव्हा, महागाव, उमरखेड, आणि व नेर या सात तालुक्यांमधील आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प, पारधी विकास योजना, स्वाभिमान सबळीकरण योजना, प्रधानमंत्री वनधन केंद्र योजना, आदि आदर्श ग्रामविकास योजना, कन्यादान योजना, शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहे योजना, नामांकीत इंग्रजी माध्यम आश्रमशाळा अशा विविध योजनांविषयीची माहिती आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना मुंगसाजी शेड्युल ट्राईल बहुउद्देशिय संस्था, आडगांव ता. पुसद यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या चित्ररथाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) डी.आर. बोराळकर, सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) आर.एस. अहिर, सहायक लेखाधिकारी ही. बी. चव्हाण, कार्यालय अधिक्षक एस. व्ही. राऊत, संस्थेचे राजु गायकवाड यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व आदिवासी लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी