केंद्रीय वस्त्रोद्योग अधिकाऱ्यांकडून अति सघन कापूस लागवड प्रकल्पांची पाहणी

जिल्ह्यात सुमारे ४६४ एकर क्षेत्रावर प्रकल्प सुरू : कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आयसीएआर, सीआयसीआर आणि केव्हीकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अति सघन लागवड पद्धती प्रकल्पांतर्गत कळंब तालुक्यातील आमला आणि राळेगाव तालुक्यातील जळका, श्रीरामपूर येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्र भेटी देवून पाहणी केली. कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पीक उत्पादन वाढीसाठी अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पामध्ये कमी क्षेत्रात झाडांची संख्या वाढून योग्यरित्या नियोजन करून पिकाच्या उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. हा प्रकल्प जिल्ह्यामध्ये यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, कळंब आणि नेर तालुक्यामध्ये जवळपास ४६४ एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. या भेटी दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता वर्मा, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रमुख डॉ. ए. एस. तायडे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सीएमडी ललित कुमार गुप्ता, अकोला येथील भारतीय कापूस महामंडळाचे एजीएम नीरज कुमार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश यु. नेमाडे, शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी. आय, कळंब व राळेगाव तालुका कृषी अधिकारी सुहास भेंडे, अमोल जोशी, शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. पाटील, शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कावेरी सीड्स आणि रासी सीड्सचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राळेगाव आणि कळंब समुहातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अति सघन कापूस लागवड पद्धत प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली. अति सघन लागवड पद्धती भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी