प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्जातील त्रूटी पूर्ण करण्याचे आवाहन

महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर १२ हजार ५३६ अर्ज प्राप्त : महाकृषी ऊर्जा अभियानाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लाभार्थीशेतकऱ्यांना अर्जातील त्रूटी पूर्ण करण्याचे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.
यायोजनेंतर्गत महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण १२ हजार ५३६अर्ज ऑनलाईनरित्या प्राप्त झालेले आहेत. या अर्जापैकी १ हजार ८३७ लाभार्थी शेतकऱ्यांनीसौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण १२ हजार ५३६ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २हजार ६२६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामुळेत्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन त्यांच्याभ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालयाकडूनसर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्याकरिता भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यातआलेले आहे, तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेलीनाही.याअनुषंगाने सर्व त्रुटीयुक्त अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या जिल्हाकार्यालय येथे कार्यालयीन ०७२३२२४९१५० क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्याकागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी व प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पूर्तताकरुन घ्यावी किंवा शेतकऱ्यांना मिळालेल्या युजर नेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईनपोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी. यासाठीमहाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. जे लाभार्थी दि. २४ सप्टेंबर २०२३ पर्यंतत्रुटी पूर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील. मान्यता मिळाल्यासभविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम त्रुटी पूर्तता करणान्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगानेगणला जाईल, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी