आयुष्मान भव : मोहीम, पालकमंत्र्यांच्या हस्ते आयुष्मान कार्डचे वाटप

केंद्र शासनाच्या आयुष्मान भव: मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या मोहिमेंतर्गत नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यास सुरुवात झाली असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कार्डचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित आयुष्मान कार्ड वितरण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ पी. एस ठोंबरे उपस्थित होते. यावेळी बंटी श्रीवास, सचिन चुटे या नागरिकांना आयुष्मान कार्डचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आरोग्य मेळावा, अवयवदान जागृती, १८ वर्षावरील पुरूषांची आरोग्य तपासणी, आयुष्मान गाव सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान आयुष्मान भव: सेवा पंधरवाडा राबवून जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड काढण्यात येणार आहेत. तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेविषयी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी