जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालयातील सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश एस.एस. मतकर, प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता जी. ए. पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टी. जैन, सचिव ए. बी. बजाज,, दिवाणी न्यायाधीश डि. एस. थोरात, न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पि.एल.व्ही., तसेच पक्षकार उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत अनेक उदाहरण देत न्यायालयातील व न्यायालया बाहेरील प्रकरणे व वाद मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय विधी सेवा समिती येथे मध्यस्थीकरिता ठेवल्या जातात. मध्यस्थीमध्ये दोन्ही पक्षांना न्याय मिळतो. तसेच मध्यस्थीची प्रक्रिया ६० दिवसापर्यंत चालवली जाते. मध्यस्थी हा पक्षकारांना सर्वात चांगला उपाय आहे. संवाद संपला तर वादाला सुरूवात होते. मध्यस्थीबाबत गोपनियता बाळगल्या जाते असे श्री हांडे यांनी सांगितले. पक्षकार, अधिवक्ता, न्यायाधीश यांची मध्यस्थी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. मध्यस्थी हे संवादाचे साधन आहे. वाद शांततेत मिटविण्याकरिता खुप पर्याय आहेत. दोन्ही पक्षकारांना मध्यस्थीपर्यंत पोहचविणे व मध्यस्थीच्या फायद्यांबाबत सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. मतकर यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता जी.ए.पराते हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रकरणे कोणत्याही टप्प्यावर असतांना दावा हा मध्यस्थीकडे पाठविला जावू शकतो. स्वीकारण्या योग्य वाटेल असा तडजोडीचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आल्यास प्रकरण, समुपदेशन, लोकअदालत, मध्यस्थ यांचेकडे पाठविता येते. मध्यस्थीने प्रकरण निकाली काढल्यास पक्षकार यांची पैसा व वेळेची बचत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अधिवक्ता तरुणा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश डी. एस. थोरात यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी