गॅस एजन्सीने जास्त पैसे घेतल्यास ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन

गॅस वितरण एजन्सीने ग्राहकांकडून विक्रीमूल्यापेक्षा जास्त पैसे घेणे, पावती न देणे यासारख्या अनियमितता निदर्शनास आल्यास त्याविरोधात ग्राहकांनी सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व तेल कंपनीमार्फत दरमहा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर गॅसचे दरपत्रक प्रसिद्ध केले जातात. तसेच सर्व गॅस एजन्सीद्वारे गॅसचे दरपत्रक दर्शनी भागात लावून गॅस निर्धारित दरात वितरित करणे बंधनकारक आहे. गॅस एजन्सीमार्फत बुकिंग केल्यानंतर अधिकृत विक्री दरापेक्षा जादा पैसे देऊ नये. तसेच गॅस वितरणानंतर पावतीचा आग्रह करावा. गॅस वितरण एजन्सीने ग्राहकाकडून विक्रीमूल्यापेक्षा जास्त पैसे घेणे, पावती न देणे यासारख्या अनियमितता घडल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात ग्राहक सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करु शकतात. तक्रार निवारणकरिता टोलफ्री क्रमांक 18002333555 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी जिल्ह्यातील सर्व गॅस धारकांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी