बेरोजगार युवकांना रोजगारासाठी रविवारी इंडस्ट्री मिट

कौशल्य केंद्रे आपल्या दारी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता गुरुनानक भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, नागपूर येथे इंडस्ट्री मिट आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थ्‍ित राहणार आहे.
या कार्यक्रमात “कौशल्य केंद्रे आपल्या दारी” या संकल्पनेतून नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज, सिक्युरिटी एजन्सी यांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील उद्योजक व औद्योगिक संघटना, मोठे हॉटेल्स, मॉल्स व बेरोजगार उमेदवारांनी या “इंडस्ट्री मिट” चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी