अमृत कलश यात्रा काढतांना लोकसहभागावर भर द्या - डॅा.पंकज आशिया

Ø ‘मेरी माटी, मेरा देश’ टप्पा दोनला सुरुवात ; Ø प्रत्येक गावात निघणार ‘अमृत कलश’ यात्रा ; Ø गावागावातून होणार माती, तांदुळचे संकलन ;
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेद्वारे घराघरातून मातीचे संकलन केले जात आहे. यात्रेत गावातील नागरिकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलेश यात्रेचे आयोजन करून मातीचे संकलन करण्यात येत आहे. या यात्रेचे आतापर्यंत झालेले काम व पुढील तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास चंदनकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. आता दि.30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने काढल्या जाणाऱ्या या यात्रेत प्रत्येक घरातून मुठभर मातीचे संकलन केले जातील. यात शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. ज्या कुटुंबांकडे शेती नाही, अशा कुटुंबांकडून चिमूटभर तांदुळ मातीच्या कलशामध्ये जमा केले जाणार आहे. प्रत्येक गावातून एक कलश तयार केला जातील. गटग्रामपंचायत असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातून स्वतंत्र कलश तयार केला जातील.
प्रत्येक गावातून एक कलश तयार केल्यानंतर उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर तयार केलेल्या अमृत वाटीकेकरीता करण्यात येणार आहे. गावातून कलश यात्रा काढतांना वाद्य वाजवत उत्साहवर्धक वातावरणात काढण्यात यावी. माती व तांदुळाचे संकलन करतांना पंचप्रण शपथ घेण्यात यावी, असे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. जिल्ह्यात दि.1 ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत गावस्तरावरील प्रत्येकी एक याप्रमाणे गटविकास अधिकारी यांच्याकडे कलश जमा करून घेतले जातील. प्रत्येक गावातून आलेली माती एकत्र करून त्यातून एक कलश तयार केला जातील. उरलेली माती तालुकास्तरावर तयार केलेल्या अमृत वाटिकेसाठी उपयोगात आणली जातील. यादरम्यान तालुकाठिकाणी देखील अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सैन्यातील विरांच्या कुटुंबियांना सहभागी करून घेतले जातील. तालुक्यातील अमृत कलश जिल्हास्तरावर पोहोचविला जातील. सर्व तालुक्यातून जिल्हास्तरावर जमा झालेले कलश दोन स्वयंसेवकांद्वारे मुंबई येथे दि.22 के 27 ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी नेले जाणार आहे. मुंबई येथून हे कलश दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविले जातील. गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या या सर्व कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी