शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली असून अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे आता शासनाकडून सोमवार दि. ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्याची तसेच सन २०२१-२२ पा शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील पात्र सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घ्यावे. पात्र विद्यार्थी अर्ज भरण्यापासून व शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची असून अशा विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयास आकारता येणार नाही, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी