जिल्ह्यातील दिव्यांगांना एम्प्लॉयमेंट कार्ड मिळणार

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान : जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत दि. २९ सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ज्या दिव्यांग व्यक्तीकडे एम्प्लॉयमेंट कार्ड (रोजगार कार्ड) नाहीत अशा १८ ते ५५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना शिबिराच्या दिवशी एम्प्लॉयमेंट कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगार कार्ड वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता दिव्यांग उमेदवारांनी क्यूआर कोड किंवा कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळाद्वारे नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच शिबिराच्या दिवशी स्वतः चे आधारकार्ड, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी), अंतिम वर्षाची गुणपत्रिका, भ्रमणध्वनी क्र. इ. आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या सा. शितोळे यांनी केले आहे.
नोंदणीसाठी क्यूआर कोड : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंतर्गत रोजगार कार्ड मिळविण्यासाठी दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा क्यूआर कोड स्कॅन करुन रोजगार कार्ड साठीचा फॅार्म भरुन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी