रिझर्व बँकेच्यावतीने एमएसएमई उद्योजकांसाठी बैठक

भारतीय रिझर्व बँक नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी टाऊन हॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक प्रमुख बँकांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आली होती.
भारतीय रिझर्व बँक, नागपूर येथील प्रादेशिक संचालक सचिन शेंडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी.एस.रावत, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक राकेश कुमार यादव, सेंट्रल बँक इंडियाचे उप महाप्रबंधक संदीपान दासगुप्ता, बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक रमेश कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, अग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते, नाबार्ड डिडिएम दिपक पेंदाम यांच्यासह भारतीय स्टेट बँक व इतर बँकांचे वरिष्ठ बँक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील एमएसएमई कर्जदारांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान एमएसएमईशी संबंधित योजनांवरील विविध सत्रात झेड प्रमाणपत्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या योजनांचा समावेश करण्यात आला. आपल्या उद्घाटनपर भाषणात श्री.शेंडे यांनी बैठकीचे उद्दिष्ट आणि वेळेवर आणि सुलभ कर्जाद्वारे एमएसएमईचे पालन पोषण करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी सहभागींना एमएसएमईसाठी असलेल्या विद्यमान योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. पारंपरिक कारागीर आणि लघुउद्योजकांना पाठींबा देण्यासाठी बँका पुढे येत आहेत, हे सकारात्मक लक्षण असल्याचे ते म्हणाले. खुल्या चर्चासत्रादरम्यान, अधिकाऱ्यांनी सहभागी च्या प्रश्नांना उत्तरे दिली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी