गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळ्यांचा वापर करावा - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांनी फेरोमन सापळे लावून गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात एकूण 4 लाख 71 हजार 527 हे. क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झालेली असून पीक सध्या पाती, फुले, तसेच बोंडे धरणाच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळलेला आहे. त्याचप्रमाणे बाभूळगाव दारव्हा व कळंब तालुक्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. गुलाबी बोंडअळीची तीव्रता ठरविण्याच्या दृष्टीने प्रति हेक्टरी पाच फेरोमन सापळे व त्यामध्ये पेक्टिनोफेरा लुर्स लावण्यात यावी. या ट्रॅपचे निरीक्षण दररोज सकाळी घेण्यात यावे. ट्रॅपमध्ये गुलाबी बोंडअळीचे आठ ते दहा नर पतंग सतत तीन दिवस आढळल्यास शिफारशीतील मात्रे प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे नरपतंग ट्रॅपमध्ये पकडून गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण मिळवायचे असेल त्यांनी प्रति हेक्टरी 20 फेरोमन ट्रॅपचा वापर करावा. जिल्ह्यातील ठराविक गावातील क्लस्टरमध्ये कृषी विभागामार्फत फेरोमन ट्रॅप देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना खाजगीरित्या बाजारातून फेरोमन ट्रॅप विकत घ्यायचे असल्यास त्यांनी हरित बायो कंट्रोल लॅब यांना 9422167481 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोकार्डचा सुद्धा वापरता येतील. यवतमाळातील दत्त चौकातील विदर्भ बायोटेक लॅब येथून शेतकऱ्यांना ट्रायको कार्ड घेता येईल. त्याकरिता 9422869423 किंवा 9168186174 व 9511851517 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यामध्ये विविध बियाणे कंपन्यामार्फत शंभर टक्के अनुदानावर काही प्रमाणात फेरोमन ट्रॅपचे निवडक गावात प्रातिनिधीक स्वरूपात वाटप होणार आहे. तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या दृष्टीने काही अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाला 9403229991 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी