माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृती योजना

३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन : केंद्र शासनाने माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृती योजना सुरु केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी किंवा डिप्लोमा किंवा पदवी परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व पुढे अभियांत्रिकी पदवी, बीडीएस, वेटर्नरी, एमबीए, बीफार्म, बीबीए, बीएड आणि एमसीए सारख्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरीता केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे येथील सैनिक कल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे. या योजनेसाठी पात्र व इच्छुक माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांनी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या www.ksb.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. या ऑनलाईन अर्जाची एक प्रत संलग्न कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद