प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध ; सात दिवसात आक्षेप सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मतदान केंद्राच्या प्रारूप मतदार याद्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर काल प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारूप यादीबाबत आक्षेप असल्यास सात दिवसात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 76- वणी, 77- राळेगांव, 78- यवतमाळ, 79- दिग्रस, 80- आर्णी, 81- पुसद, 82- उमरखेड या विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. या मतदार नोंदणी अंतर्गत मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने १५०० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार केंद्राच्या बाबतीत मतदान केद्रांचे विभाजन करून अथवा मतदार इतर मतदान केद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणामध्ये बदल झालेले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी