राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मुलन मोहीम

> अवैध हातभट्टी दारु, पाच हजार लिटर मोहफुल सडवा नष्ट ; > १७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही ; > धाबा मालकासह अवैधरित्या दारु पिणाऱ्यांवर गुन्हे ;
जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष हातभट्टी निर्मुलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कळंब तालुक्यातील कळंब माथा, पारधी बेडा, कळंब आणि चिंचोली गावातील अवैध हातभट्टीच्या ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारु व पाच हजार लिटर मोहफुल सडवा, दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून हातभट्टीची ठिकाणे उध्वस्त करण्यात आले. ही कार्रवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्रवाईत भरारी पथकाचे निरीक्षक संतोष भटकर, कळंबच्या पोलीस निरीक्षक दिपमाला भेंडे, दुय्यम निरीक्षक धमेंद्र त्रिपाठी, डि.ओ कुटेमाटे, चंद्रशेखर दरोडे, प्रिया बाभुळकर, सजंय बोडेवार, निलेश वानखेडे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, सुभाष चौधरी तसेच ए.ए. पठाण, संदीप दुधे, अमोल बोथले, सतीश घाडगे, निखील दहेलकर, शंकर घाटे, चिद्दरवार, बळीराम मेश्राम, विजू कुडमेथे, राजु कुडमेथे, प्रशांत भोयर, कुनाल माहुरे व इतर २५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक (भरारी पथक) यांच्या कार्यालायाद्वारे आतापर्यंत एकूण १७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच धाब्यावर अवैधरित्या दारु पिणाऱ्यांवर व धाबा मालकावर कलम १८ व ८४ नुसार एकूण ८ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध हातभट्टीची दारु निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांची नावे कार्यालयाच्या ०७२३२-२४४२५६ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. तसेच मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींनी विनापरवाना कोणत्याही धाबा, घर, झोपडी, शेड या अवैध ठिकाणी मद्यप्राशन करुन नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी