बाभुळगाव येथे मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम

आ.डॉ.अशोक उईके यांची उपस्थिती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त राबविण्यात येत असलेल्या टप्पा दोनचा गावस्तरीय शुभारंभ बाभुळगाव येथे आ.डॅा.अशोक उईके यांच्या हस्ते झाला. अभियानाच्या या टप्प्यात गावस्तरावर मातीचे संकलन करून त्याचे कलश तालुकास्तरावर पोहोचविले जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानाचा दुसरा टप्पा दिनांक 1 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा शुभारंभ आ.डॅा.उईके यांच्याहस्ते झाला. बाभुळगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तहसिलदार मिरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका वैद्यकिय अधिकारी, डॉ.क्रांतीकुमार नावंदीकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पुडके, कृषि अधिकारी श्रीमती चव्हाण, पंचायत समितीतील पंचायत, आरोग्य, कृषि, शिक्षण या विभागांचे सर्व विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीस्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते. अभियानांतर्गत गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या उपक्रमाबाबत डॉ.उईके यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. आयुष्यमान भारत योजनेबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमावेळी 'माझी माती माझा देश’ उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करुन उपक्रम साजरा करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. कार्यक्रमावेळी तहसिलदार मिरा पागोरे व गट विकास अधिकारी रविकांत पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व पंचप्राण शपथ सर्वासह घेतली. कार्यक्रमाचे संचालन पंचायतचे विस्तार अधिकारी ए.पी. पोपळकर यांनी केले. अभियानांतर्गत दि.30 सप्टेंबर पर्यंत गावोगावी अमृत कलश यात्रा काढली जात असून प्रत्येक घरातून माती गोळा केली जाणार आहे. या मातीचा कलश तालुका व तेथून जिल्हास्तरावर पोहोचविला जाणार, असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी