सोयाबीन पिकाची शास्त्रज्ञ व कृषि विभागाकडून संयुक्त पाहणी

शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन केले मार्गदर्शन ; सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची अमरावती येथील प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे पथक आणि कृषी विभागाने सोमवारी संयुक्त पाहणी केली. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण व मार्गदर्शन केले.
या पथकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अधिनस्त प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती येथील डॉ. वर्षा टापरे, डॉ.निचळ, डॉ. मुंजे, डॉ. घावडे, डॉ. दांडगे तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, डॉ.विपुल वाघ, डॉ.वसुले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांचा समावेश होता. यवतमाळ तालुक्यातील हिवरी व खरोला, आर्णी तालुक्यातील जवळा, महागाव तालुक्यातील दहीसावाळी व आंबोडा तसेच उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी व सुकळी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण केले. ऑगस्ट महिन्यात पावसात पडलेला खंड, वाढलेले तापमान, अन्नद्रव्याची कमतरता, त्यानंतर सततचा पाऊस अशा विविध कारणांमुळे सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव, चारकोल रॉट व मुळकुज तसेच पिवळा मोझॅकचा उद्रेक याबाबत सखोल तांत्रिक निरीक्षणे नोंदविली व सध्याच्या परिस्थितीत ज्या शेतामध्ये शेंगा भरण्याचे अवस्थेत आहे, अशा ठिकाणच्या सोयाबीनवर ट्याबुकोनाझोल 10 टक्के अधिक सल्फर ६३ टक्के ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात फवारणी करावी, असे उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पिक काढणीनंतर रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांना हरभरा पिक घ्यायचे आहे, त्यांनी ट्रायकोडर्मा पावडर प्रती एकरी २ किलो प्रमाणे सेंद्रीय खतात मिसळून शेतामध्ये पसरवावे. त्यासोबतच प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी