पालकमंत्र्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयात चार मोड्यूलर ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करा - पालकमंत्री संजय राठोड >रुग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सेवा >शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबई, पुण्याला जावे लागणार नाही >देशातील अशाप्रकारचे पहिलेच मोड्यूलर ॲापरेशन थिएटर >डिजिटल ऑपरेशन थिएटर संचालन यंत्रणांनी सुसज्ज > एआय रोबोटचा वापर >शस्त्रक्रियांसाठीची अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चार मोड्यूलर ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आमदार मदन येरावार, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, वैद्यकीय शिक्षणचे उपसंचालक डॅा. राज गजभिये, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अधिष्ठाता डॅा. गिरीष जतकर आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड यांनी अत्याधुनिक सुविधेची पाहणी केली. या सुविधेचे कौतुक करुन ॲापरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजेत. या सुविधेचा लाभ जनतेला मिळाला पाहिजेत. वैद्यकीय महाविद्यालय सर्वांच आहे. याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध केला जाईल. ऑपरेशन थिएटर सारख्या सुविधा रुग्णालयातील वार्डमध्ये उपलब्ध कराव्यात. महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना मुंबई, पुण्यासारख्या नामांकित रुग्णालयातील सुविधांचा अनुभव येईल अशा सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे कॅन्सरचे उपचार यवतमाळलाच व्हावे यासाठी कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शासनस्तरावरील विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री राठोड यांनी सांगितले. आमदार मदन येरावार यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मॅाड्यूलर ऑपरेशन थिएटर्स जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देणारे ठरणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्याने नामांकित डॅाक्टरही शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध होतील. या अत्याधुनिक सुविधेचा लाभ जनतेला मिळाला पाहिजेत. रुग्णांना जास्तीत जास्त सेवा मिळावी यासाठी महाविद्यालय व रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार आहे. रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. गोरगरीबांसाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजेत, अशा सूचना श्री. येरावार यांनी केल्या. यावेळी वैद्यकीय उपसंचालक डॅा. राज गजभिये, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॅा.गिरीष जतकर यांनी केले.
जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय उपचार किंवा आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात जावे लागते. पण आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आल्याने याठिकाणी मोठमोठ्या शस्त्रक्रिया होण्यास मदत होणार आहे. यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर संपूर्ण डिजिटल यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच शल्यक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टाळणे शक्य होणार असून डॅाक्टरांना देखील योग्य वातावरणात शस्त्रक्रिया करता येणार आहे. देशातील अशाप्रकारचे पहिलेच मोड्यूलर ॲापरेशन थिएटर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यात डिजिटल ऑपरेशन थिएटर संचालन यंत्रणांनी सुसज्ज आहे. तसेच एआय रोबोटचा वापर केला जाणार आहे. शस्त्रक्रियांसाठीची अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध झाल्या आहेत.या चार मोड्यूलर ऑपरेशन थिएटरसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी १५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करुन दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी