अवैध ताडी, हातभट्टीवर उत्पादन शुल्क विभागाचे छापे

एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल ; जिल्ह्यातील अवैध ताडी व हातभट्टी दारु निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात बुधवारी दि.२७ सप्टेंबर रोजी तारपुरा, रातचांदना शिवार आणि वडगाव रोड येथे राज्य उत्पादन शुल्क कडून छापे टाकण्यात आले. या कारवाईत मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईत सहा आरोपींविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून १०० लिटर ताडी, ११ लिटर देशी व विदेशीदारु, १३२ लिटर हातभट्टी दारु, ६०० लिटर मोहफुल सडवा तसेच एक फ्रिज, दोन दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण एक लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संतोष भटकर, दुय्यम निरीक्षक धमेंद्र त्रिपाठी, प्रभारी निरीक्षक डी.ओ.कुटेमाटे, दुय्यम निरीक्षक गणेश कसरे, चंद्रशेखर दरोडे, प्रगती मांडवधरे, चंद्रकांत नागुलवाड, दिगांबर नेवारे तसेच कर्मचारी अविनाश पोंदेर, महेश खोब्रागडे, दिनेश पेंदोर, प्रविण मसराम, अमोल बोथले आणि महेदा रामटेके यांनी कार्यवाही केली. यवतमाळ जिल्ह्यात अवैध ताडी व हातभट्टीची दारु निर्मिती, विक्री आणि वाहतूक करीत असणाऱ्यांची नावे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील ०७२३२/२४४२५६ या दुरध्वनी क्रमांकावर कळवावे. तसेच मद्यप्राशन करणाच्या व्यक्तींनी विनापरवाना कोणत्याही धाबा, घर, झोपडी, शेड या ठिकाणी मद्यप्राशन करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी