दारव्हा शहर पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करा - संजय राठोड

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिले दिले.
दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रगती आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, दारव्हा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गट विकास अधिकारी राजीव शिंदे आदी उपस्थित होते. या पाणी पुरवठा योजनेच्या दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत दारव्हा शहर पाणी योजनेची ३१ कोटी २४ लाख रुपये किंमतीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा कंत्राटदार मे.इंद्रायणी कंस्ट्रक्शन, औरंगाबाद यांना अंदाजपत्रकीय दराच्या एक टक्के ज्यादा दराने किंमत ३१.५५४ कोटी रुपये प्रदान करण्यात आली आहे. कामाचे आदेश ३ सप्टेंबर २०१६ रोजी देण्यात आले होते. या योजनेतील समाविष्ठ असलेल्या उपांगापैकी जवळपास ८५ टक्के कामे पूर्ण झालेले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी