अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शैक्षणिक योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी दि. ८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्याची तसेच सन २०२१-२२ पा शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाडीबीटी प्रणालीवरील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु, अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज भरलेले नाही सद्यस्थित शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरु झालेले असून या शैक्षणिक वर्षांतील अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु होणार आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाडीबीटी पोर्टल भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांतीत अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत शासनाकडून अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी या संकेतस्थळावर ८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घ्यावे. पात्र विद्यार्थी अर्ज भरण्यापासून व शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची असून अशा विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयास आकारता येणार नाही, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी