जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबरला

महात्मा गांधी जयंती दिनी शासकीय सुट्टी असल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केल्या आहेत.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती येत असल्यामुळे या दिवशी लोकशाही दिन सभेचे आयोजन होणार नाही. त्याऐवजी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी बळीराजा चेतना भवन, (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेत जनतेच्या तक्रारी किंवा गाऱ्हानी ऐकून त्या स्विकारुन कार्यवाही करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल