दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रम 29 सप्टेंबरला

जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगार कार्ड वितरीत होणार : जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ज्या दिव्यांग व्यक्तीकडे एम्प्लॉयमेंट कार्ड (रोजगार कार्ड) नाहीत अशा 18 ते 55 वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना दि. 29 सप्टेंबर रोजी एम्प्लॉयमेंट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगार कार्ड वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता दिव्यांग उमेदवारांनी शिबिराच्या दिवशी स्वतः चे आधारकार्ड, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी), अंतिम वर्षाची गुणपत्रिका, भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी आवश्यक त्या कागदपत्रांसह चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती (खाजगी) एमआयडीसी लोहारा,यवतमाळ येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या सा. शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद