जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय तसेच आर्णीतील उमरी पठार येथील संत श्री दोला महाराज वृध्दाश्रम यांच्यावतीने संत श्री. दोला महाराज वृध्दाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच जेष्ठांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या शिबीरास तसेच जेष्ठांकरिता आयोजित कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल