आझाद मैदान येथे स्वेटर दुकानासाठी कालबध्द कार्यक्रम

शहरातील आझाद मैदान येथे स्वेटर दुकानासाठी खुली जागा मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकियेदरम्यान अधिकाधिक पारदर्शकता राखणे तसेच प्रकियेमध्ये सहभागी होण्याची पुरेशी संधी संबंधितांना मिळावी व शासनास तसेच मैदानांच्या देखभालीसाठी योग्य प्रमाणात महसूल प्राप्त व्हावा, याअनुषंगाने दि 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रक्रिया अटी व शर्तीला अधिन राहून राबविण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या sdoyavatmal.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जच स्विकारण्यात येईल.अर्जासोबत नगर परिषदचे नाहरकत प्रमाणपत्र, चरित्र प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत आणि चार फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावे. या कागदपत्रासह अर्जाच्या तीन प्रती या कार्यालयास अर्ज केल्यानंतर तीन दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक राहिल. इतर सर्व विस्तृत माहिती आणि अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसिलदार कार्यालय, नगर परिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी