वाळू उत्खनन, वाहतूकीच्या ई-निविदा प्रकियेस ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुसद तालुक्यातील वडसद येथील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या नदीपात्रातील स्थळातून गाळ व गाळमिश्रीत वाळू उत्खनन करुन डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मीती तसेच व्यवस्थापनाकरिता ई-निविदा काढण्यात आली होती. या कामासाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त न झाल्याने या ई-निविदा प्रकियेला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या ई-निविदा प्रक्रियेत इच्छुक कंत्राटदारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. ई-निविदा फॉर्म रक्कम ७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जमा करता येईल. तसेच ई-निविदा स्विकारण्यात येतील. कंत्राटदारांना ई-निविदा प्रक्रियेत भाग घेण्याकरिता https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी विहित मुदतीत करणे आवश्यक राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी